शहरं
Join us  
Trending Stories
1
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर
2
लालपरीचा प्रवास महाग होणार का? एसटी तिकीट दराबाबत मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली महत्वाची माहिती
3
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल
4
MLC Election Maharashtra: महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक! विधान परिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक
5
Top Marathi News LIVE: ट्रक-व्हॅनचा भीषण अपघात, १० प्रवाशांचा मृत्यू, मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश
6
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
7
Travel : पैशांपेक्षा आनंदाला महत्त्व देणारा जगातील एकमेव देश! आयुष्यात एकदा तरी भेट द्यायलाच हवी
8
लखीमपूर खिरीत भीषण अपघात; ट्रक आणि मॅजिकची जोरदार धडक, १० जणांचा मृत्यू, ४ जखमी
9
नाकात नथ अन् कपाळी चंद्रकोर! कान्समध्ये अवतरली मदनमंजिरी, प्राजक्ता माळीने नऊवारीत दाखवला मराठी ठसका
10
Twisha Sharma: 'मी अडकलेय रे, पण तू अडकू नकोस', ट्विशाचा मीनाक्षीला मेसेज, त्यानंतर मृत्यूचीच बातमी आली; असं काय घडलं?
11
बचत करताना 'हे' लक्षात ठेवा, नाहीतर कष्टाची कमाई 'अशी' होईल बरबाद!
12
बेपत्ता मुलीच्या कुटुंबाच्या विनवण्या, पोलीस अधिकारी म्हणाले शोधण्यासाठी गाडीत 'डिझेल'च नाही; नागपूरमधील धक्कादायक प्रकार
13
Safest Cars: किया सेल्टोस ते टाटा पंच...,भारतातील सुरक्षित गाड्या; क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार!
14
अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेतही कान्समध्ये पोहोचला, आईचा फोटो शेअर करत म्हणाला...
15
'राजा शिवाजी' ठरला ब्लॉकबस्टर! १०० कोटी कमावणारा मराठीतला दुसरा सिनेमा, 'सैराट'चा विक्रम मोडणार?
16
"दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा
17
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चूक झाल्यास आता डिलीट करायची झंझट मिटली; कंपनीने आणले भन्नाट 'Edit' फीचर!
18
Pavala Shyamala : ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; पैसे नसल्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्रीला रुग्णालयाने नाकारले उपचार
19
Fact Check: विश्वास नांगरे पाटील यांच्याबाबतचे 'ते' क्रिएटिव्ह FAKE; 'लोकमत'चे नाव आणि लोगो वापरून दिशाभूल
20
गोरखपूर इंजिनिअर मृत्यू प्रकरण; नवऱ्याला मृत्यूच्या दारात ढकलणारी 'ती' क्रूर पत्नी अखेर गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कार्यालयांचे पासवर्ड असुरक्षित व्यक्तींच्या हातात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : शासनाच्या सर्व सुविधा आता ऑनलाईन झाल्या असून प्रत्येक शासकीय कार्यालय ऑनलाईन झाले आहे. याठिकाणी ...

ठळक मुद्देअनेक ठिकाणी खासगी व्यक्तींची नेमणूक । तलाठी कार्यालयांसह विविध ठिकाणी वापर

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शासनाच्या सर्व सुविधा आता ऑनलाईन झाल्या असून प्रत्येक शासकीय कार्यालय ऑनलाईन झाले आहे. याठिकाणी ऑनलाईन कामासाठी गोपनीय पासवर्ड देण्यात आले आहे. मात्र अनेक कार्यालयात ही प्रणाली खासगी व्यक्ती हाताळत असून गोपनीय पासवर्ड असुरक्षित हाती गेल्याचे दिसून येत आहे.
तलाठी साझासह विविध कामे जलद गतीने व्हावे, जनतेला कागदपत्र वेळेत मिळावे यासाठी संगणकीकृत ऑनलाईन प्रणाली अस्तित्वात आली आहे. सर्वसामान्य नागरिकांना यामुळे विविध दाखले मिळणे सोईचे झाले आहे. परंतु अनेक ठिकाणी आता ही आॅनलाईनची कामे करण्यासाठी खासगी व्यक्तींची सेवा घेतली जात असल्याचे दिसून येते. अनेक कर्मचारी ऑनलाईन प्रणाली हाताळण्यास घाबरताना दिसतात. त्यामुळे त्यांनी आपल्या सोयीसाठी नियमबाह्य खासगी व्यक्तींची नेमणूक केली आहे. आपली कामे करण्यासाठी त्या व्यक्तींना गोपनीय पासवर्ड देण्यात आला आहे. सदर कर्मचाऱ्यांच्या मर्जीतील ही मंडळी असली तरी या पासवर्डचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेकदा ऑनलाईन प्रणाली हाताळताना चुकीच्या नोंदी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र याकडे कुणाचेही लक्ष दिसत नाही. तलाठी साझ्यासह अनेक कार्यालयात कर्मचाऱ्याआड खासगी व्यक्ती आॅनलाईन प्रणाली हाताळत असल्याने गोपनीयतेचा भंग होत असल्याचे दिसत आहे.

तलाठी संवर्गातील कर्मचाऱ्यांना शासनाने सर्व कामे ऑनलाईन करण्याचे सक्तीचे केले आहे. त्यांना सॉफ्टवेअर पुरविण्यात आले आहे. त्यासाठी गोपनीय पासवर्ड देण्यात आले. सात बारा अद्यावत करणे, फेरफार नोंदविणे, वारसा फेरफार करणे, क्षेत्र दुरूस्ती करणे अशी कामे तलाठ्यांकडून केली जातात. परंतु काही तलाठी साझ्यामध्ये गेल्यास तेथे खासगी व्यक्ती ऑनलाईन प्रणालीवर काम करताना दिसून येते. वरिष्ठांनी याप्रकरणी लक्ष घालण्याची गरज आहे.