शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

पांगडी-लेडेंझरी परिसर जैवविविधतेची खाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 05:00 IST

पांगडी, लेंडेझरी परिसरात असलेल्या परिसरात विस्तीर्ण तलाव आहे. यासोबतच वाघ, बिबट, सांबर, अस्वल या हिंस्त्र प्राण्यांसह मोर, हरिण, चितळ यासह असंख्य पशुपक्षांचे वास्तव्य आहे. जंगल क्षेत्रात आंजन, मोहा, आवळा, बाभूळ, हिरडा, बेहडा, शिशम, कडूनिंब, पळस, गराडी, धावडा, बीजा, हळद, शमी, बिबा व तेंदू यासह अनेक वनस्पती येथे आहेत. पहाडी टेकड्यांनी वेढलेल्या या रमनीय सौंदर्यात तलावाने अधिकच भर घातली आहे.

ठळक मुद्देइच्छाशक्ती पण निधीचा अभाव

इंद्रपाल कटकवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : हिरवीगार वनश्री, वन्यजीव व वनसंपत्तीने नटलेल्या भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्याअंतर्गत येणाऱ्या पांगडी, लेंडेझरी हा राखीव जंगल जैविविधतेने संपन्न आहे. सातपुडा पर्वत रांगाच्या सौंदर्याने हा परिसर पर्यटकांनाही सातत्याने खुनावत असतो. मात्र नयनरम्यता असूनही फक्त निधीअभावी या परिसराचा विकास होऊ शकलेला नाही.पांगडी, लेंडेझरी परिसरात असलेल्या परिसरात विस्तीर्ण तलाव आहे. यासोबतच वाघ, बिबट, सांबर, अस्वल या हिंस्त्र प्राण्यांसह मोर, हरिण, चितळ यासह असंख्य पशुपक्षांचे वास्तव्य आहे. जंगल क्षेत्रात आंजन, मोहा, आवळा, बाभूळ, हिरडा, बेहडा, शिशम, कडूनिंब, पळस, गराडी, धावडा, बीजा, हळद, शमी, बिबा व तेंदू यासह अनेक वनस्पती येथे आहेत. पहाडी टेकड्यांनी वेढलेल्या या रमनीय सौंदर्यात तलावाने अधिकच भर घातली आहे. यासोबतच बंदरझीरा, बघेडा, रामपूर, शिवनी इत्यादी रमनीय तलावाचा भूभाग म्हणूनही हे क्षत्र ओळखले जाते. जवळपास १२५ किमीचे क्षेत्र राखीव जंगल असून अभयारण्याकरिता उत्कृष्ट अशी निसर्गाने दिलेली देणगी आहे. त्यात पांगडी जलाशय हा पर्यटकांना नेहमी खुणावत असतो. लॉकडाऊन काळात पर्यटकांची संख्याही मोठ्या प्रमाणात रोडावली.गायमुख टेकडीवरुन या तलावाचे विहंगम दृष्य सर्वांनाच मोहीत करतो. या स्थळाचा विकास झाल्यास जैवविविधतेने नटलेल्या या क्षेत्रात पर्यटक व वन्यप्रेमीची वर्दळ पहायला मिळू शकते. मिटेवानी, चिचोली, नाकाडोंगरी व चिचोली फाट्यावरुन बघेडा, रोंधा, मंगर्ली मार्गे नागपूर जिल्ह्यातही जाता येते. विविधतेने समृध्द व संपन्न असलेल्या या क्षेत्रात जैवविविधता पार्क असणे गरजेचे आहे.इच्छाशक्ती पण निधीचा अभावसातपुडा पर्वत रांगाच्या कुशीत वसलेल्या गायमुख, चांदपूर, गायखुरी, डोंगरमाला या परिसरात नानाविध पशु, पक्षी, प्राणी व समृध्द वनसंपदा आहे. जैविक विविधतेने नटलेल्या हा परिसर इच्छाशक्ती व निधीअभावी विकासापासून कोसो दूर आहे.नैनीताल म्हणून नावारुपास आलेल्या तुमसर तालुक्यातील पांगडी लेंडेझरी परिसरासोबतच गर्रा, बघेडा, आसलपाणी, रामपूर, गायमुख, कवलेवाडा, आष्टी, लोभी, धुटेरा, आलेसुर, देवनारा, डोंगरली आदी क्षेत्रांचाही विकास होणे अपेक्षीत आहे.तुमसर तालुका वगळता जैवविविधतेसाठी अड्याळपासून दहा किमी अंतरावर असलेल्या किटाडी तसेच कातुर्ली, तेलपेंढरी, भिवखिडकी, मांगली, सायगाव, बंदराझरी, तिर्री, खैरी, शेगाव या जवळपास सात हजार हेक्टर क्षेत्र राखीव जंगलात येतो.जल, जंगल, जानवर, जमीन यांचे संरक्षण होणे अत्यंत महत्वाचे आहे. तरच सजीव सृष्टी तग धरु शकते. जैविविधतेने नटलेल्या तुमसर तालुक्यासह अन्य क्षेत्राचा विकास होणे अत्यंत गरजेचे आहे. राज्य शासनाने या बाबीकडे लक्ष देत सदर क्षेत्र संरक्षीत करुन पर्यावरण, वन्यजीव संरक्षणाचे काम करावे. जेणेकरुन त्यापासून मानवजातीलाही लाभ होईल.-मो. सईद शेख,पर्यावरण अभ्यासक, भंडाराभंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील राखीव वनात भरपूर जंगल, वनस्पती, वन्यजीव, तलाव आहे. यात जैवविविधता समृध्द संपन्न आहे. कोसाचे उत्पादन होत असून नैसर्गिक बांबीवर भर देणे महत्वाचे आहे. आर्थिक उन्नती साधण्यासाठीही भर द्यावे.- वसुंधरा फाळकेपर्यावरण कार्यकर्ता, भंडारा

टॅग्स :tourismपर्यटनIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प