शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
4
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
5
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
6
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
7
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
8
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
9
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
10
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
11
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
12
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
13
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
14
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
15
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
16
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
17
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
18
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
19
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
20
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

धानपिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 05:00 IST

जिल्ह्यात आलेल्या पूरपरिस्थितीमुळे तुमसर तालुक्यातील विविध गावांना फटका बसला आहे. यासाठी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली आहे. मात्र त्यानंतर महसूल विभागाचे कर्मचारी मात्र अद्याप शेतशिवारात फिरले नसल्याने शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. पूरपरिस्थितीतून वाचलेल्या पिकांसाठी कृषी विभागांमार्फत मोठ्या प्रमाणात विविध औषधे पुरवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ.हरेंद्र राहांगडाले यांनी केली आहे.

ठळक मुद्देकृषी कर्मचारी नुकसानीच्या कामात व्यस्त : बळीराजा सापडला संकटात

लोकमत न्यूज नेटवर्क
पवनारा : तुमसर तालुक्यातील पवनारा, बघेडा, चिचोली, कारली, मिटेवानी परिसरात धानाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. मात्र जिल्ह्यात सातत्याने बदलणाऱ्या वातावरणामुळे धानपिकावर विविध रोग कीडींचा प्रादूर्भाव वाढला आहे. यासाठी कृषी विभागाने लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
जिल्ह्यात आलेल्या पूरपरिस्थितीमुळे तुमसर तालुक्यातील विविध गावांना फटका बसला आहे. यासाठी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली आहे. मात्र त्यानंतर महसूल विभागाचे कर्मचारी मात्र अद्याप शेतशिवारात फिरले नसल्याने शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. पूरपरिस्थितीतून वाचलेल्या पिकांसाठी कृषी विभागांमार्फत मोठ्या प्रमाणात विविध औषधे पुरवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ.हरेंद्र राहांगडाले यांनी केली आहे. यावर्षी शेतकऱ्यांवर सातत्याने विविध संकटे कोसळली आहेत. आधीच वाढलेल्या धानशेतीच्या खर्चामुळे शेतकरी संकटात आहेत. त्यामुळे आता उरले सुरले पीकही रोगामुळे शेतकऱ्यांच्या हातातून निसटले जाण्याची भीती निर्माण होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांना मदतीसाठी महसूल विभागाच्या तलाठ्यांनी ग्रामीण स्तरावर पाहणी करून पंचनामे करण्याची गरज आहे. शेतकरी चिंतातूर झाला असून पवनारा, चिचोली, बघेडा, कारली, चिखला परिसरात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात रोवणी आटोपली होती. त्यानंतर काही दिवस सातत्याने ऊन व ऑगस्ट अखेर सुरु असलेल्या संततधार पावसामुळे खोडकिडा, गादमाशीचा प्रादुर्भाव वाढला आहे. कडा करपा रोगही वाढत असून त्यामुळे काही ठिकाणी धानपीक पिवळे पडत असून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची गरज आहे.

तलाठ्यांनी बळीराजाची दखल घेण्याची गरज
प्रत्येक तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर ग्रामीण स्तरावर कृषी कर्मचाऱ्यांनी पाहणी केली आहे. मात्र याला काही ठिकाणी तलाठ्यांचा अपवाद असल्याचेही दिसून येत आहे. महसूल विभागाचे ग्रामीण भागातील तलाठी कारणे सांगून शेतकऱ्यांना पाहणीसाठी टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने मदत मिळण्यासाठी ज्यांच्या हाती महसूल विभागाची सूत्रे आहेत तेच तलाठी बळीराजाला नडवत असल्याचे काही ठिकाणी दिसत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

टॅग्स :agricultureशेती