शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

संघटनेने दिला दहा दिवसांचा ‘अल्टीमेटम’

By admin | Updated: August 23, 2016 01:08 IST

भंडारा उपवन संरक्षक कार्यालयांतर्गत दोन वनकर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

भंडारा : भंडारा उपवन संरक्षक कार्यालयांतर्गत दोन वनकर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याविरुध्द आज वनकर्मचारी संघटनेची बैठक झाली. यात त्यांनी निलंबनाची कारवाई मागे घेण्यासाठी उपवनसंरक्षक यांना दहा दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. उपवनसंरक्षक कार्यालयातील कॅम्प हाऊस येथे वनरक्षक बी.एस. कुंभारे व वरिष्ठ लिपीक एच. वाय. धार्मिक या दोघांवर १४ दिवसांचा अंतरावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या दोघांवरही वरिष्ठांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप करुन निलंबनाची कारवाई करण्यात आली. कारवाईपुर्वी दोघांचेही स्पष्टीकरण घेणे गरजेचे होते. मात्र त्यांची बाजू ऐकूण न घेता वनाधिकारी यांनी दोघांवरही निलंबनाची कारवाई केली. याविरुध्द आज सोमवारला महाराष्ट्र वनरक्षक, वनपाल संघटनेची तातडीची बैठक बोलविण्यात आली. या बैठकीला केंद्रीय अध्यक्ष विजय मेहर, जिल्हाध्यक्ष टी. एच. घुले, आय. एच. काटेखाये, के. एम. नरटंगे, एम. जे. वैद्य, मिलिंद घोरमारे यांच्या प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत निलंबित कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेली कारवाई ही सुडबुध्दीची असून ती त्वरित मागे घ्यावी अशी मागणी करण्यात आली. सदर कारवाई १० दिवसात मागे घ्यावी असा इशाराही यावेळी देण्यात आला. कारवाई मागे न घेतल्यास दहा दिवसानंतर अधिकाऱ्यांविरुध्द धरणे, असहकार आंदोलन, साखळी उपोषण अशी आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली आहे. यासोबतच सोसायटीची नियमित वेतनातून होणारी कपात बंद केल्याने आर्थिक भुर्दंड पडत आहे. ती कपात पुर्ववत सुरु करावी अशीही मागणी या बैठकीत करण्यात आली. एकंदरीतच वनकर्मचारी संघटना निलंबित कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली असून वनाधिकारी आता काय भूमिका घेते याकडे सर्वांचा नजरा लागल्या आहे. बैठकीला आय.एम. सैय्यद, व्ही. टी. बागडे, यु. बी. हटवार, डब्ल्यू. के. खान, अतुल राऊत, एम. डी. मेश्राम, वाय. टी. ठवकर, गौरी नेवारे, नान्हे, एन. डब्ल्यू कारेमोरे आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)