काेराेना रुग्णांचे सात लाख परत करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:38 AM2021-09-26T04:38:39+5:302021-09-26T04:38:39+5:30

भंडारा जिल्ह्यात काेराेनाची दुसरी लाट चिंताजनक हाेती. शासकीय रुग्णालयात खाटा अपुऱ्या पडत हाेत्या. त्यामुळे अनेक जण खासगी रुग्णालयात उपचार ...

Order to return seven lakh of Kareena patients | काेराेना रुग्णांचे सात लाख परत करण्याचे आदेश

काेराेना रुग्णांचे सात लाख परत करण्याचे आदेश

Next

भंडारा जिल्ह्यात काेराेनाची दुसरी लाट चिंताजनक हाेती. शासकीय रुग्णालयात खाटा अपुऱ्या पडत हाेत्या. त्यामुळे अनेक जण खासगी रुग्णालयात उपचार घेत हाेते. तुमसर येथील काेडवाणी हाॅस्पिटलला काेराेना रुग्णावर उपचार करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, येथे काेराेना रुग्णांकडून अधिकचे शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी हाेत्या. याची दखल घेत शिवसेना विभागप्रमुख अमित मेश्राम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली; परंतु या तक्रारीवर काेणतीही कारवाई हाेत नव्हती. अखेर शिवसेनेने ९ ते १५ जूनदरम्यान काेडवाणी हाॅस्पिटलसमाेर धरणे दिले. या आंदाेलनाला आमदार राजू कारेमाेरे, लायनेस अध्यक्ष मनाेज उकरे, माेहन पंचाेली यांनी पाठिंबा दिला.

त्यानंतर चाैकशी समिती नियुक्ती करण्यात आली. उपचारादरम्यान वसूल केलेले अधिकचे शुल्क सात दिवसांच्या आत परत करण्याचे या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे १५ रुग्णांना ७ लाख ९ हजार २५० रुपये परत मिळणार आहेत, अशी माहिती पत्रपरिषदेचे शिवसेना विभाग प्रमुख अमित मेश्राम यांनी दिली. जगदीश त्रिभुवनकर, दिनेश पांडे, संताेष पाठक, निखिल कटरे, अरुण डांगरे, तुषार लांजेवार, धम्मदीप सूर्यवंशी, मनाेज उकरे, माेहन पंचाेली, शंकर बडवाईक उपस्थित हाेते.

बाॅक्स

चार सदस्यीय चाैकशी समिती

जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चाैकशी करण्यासाठी चार सदस्यीय समिती गठित केली. त्यात उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर, उपविभागीय पाेलीस अधिकारी संताेषसिंग बिसेन, लेखाधिकारी सचिन मिलमिले, जिल्हा रुग्णालयाचे डाॅ. पीयूष जक्कल यांचा समावेश हाेता. समितीने रुग्णांकडे चौकशी करून आपला अहवाल प्रशासनाला सादर केला. त्यात रुग्णांकडून उपचारादरम्यान जास्त बिल आकारल्याचा ठपका ठेवला, तसेच जिल्हा प्रशासनाने कारवाई करावी असेही नमूद केले आहे.

Web Title: Order to return seven lakh of Kareena patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.