शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

जिल्ह्यात केवळ ३३ बालके शाळाबाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 23:30 IST

कुठलाही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी भंडारा जिल्हा परिषदेने शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबविली. अनियमित व स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी विशेष शोधमोहीम राबविण्यात आली आहे. कोविड-१९ संसर्ग कालावधीत अनेक कुटुंबांचे स्थलांतर झाले आहे.  भंडारा तालुक्यात सर्वाधिक शाळाबाह्य मुले आहेत. यात ६ ते १४ वर्षे वयोगटात कधीच शाळेत न गेलेल्या मुली ४  तर २ मुलांचा समावेश आहे.

ठळक मुद्देभंडारा तालुक्यात सर्वाधिक शाळाबाह्य मुले

इंद्रपाल कटकवारलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोनामुळे इतर जिल्ह्यातून भंडारा जिल्ह्यात परतलेल्या किंवा इतर राज्यातून जिल्ह्यात परतलेल्या बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. शाळाबाहा मुलांची शोधमोहीम  मार्च महिन्यात राबविण्यात आली.   या मोहिमेत ३३  मुले-मुली शाळाबाह्य आढळली.  त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात शिक्षण विभाग प्रयत्नशिल असल्याचे समजते. कुठलाही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी भंडारा जिल्हा परिषदेने शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबविली. अनियमित व स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी विशेष शोधमोहीम राबविण्यात आली आहे. कोविड-१९ संसर्ग कालावधीत अनेक कुटुंबांचे स्थलांतर झाले आहे.  भंडारा तालुक्यात सर्वाधिक शाळाबाह्य मुले आहेत. यात ६ ते १४ वर्षे वयोगटात कधीच शाळेत न गेलेल्या मुली ४  तर २ मुलांचा समावेश आहे. अनितमित उपस्थितीमुळे शाळेत न गेलेले शाळाबाह्य मुले ८  व मुली ५ अशी एकूण १९ बालके शाळावाहा आढळली आहेत.

मुलांची संख्या अधिक ६ ते १४ वर्षे वयोगटातील शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम मार्च महिन्यात राबविण्यात आली. या मोहिमेत एकूण ३३ बालके शाळाबाह्य आढळली. यात कधीच शाळेत न गेलेली बालके व अनियमित उपस्थितीमुळे शाळाबाह्य झालेल्या बालकांची एकूण संख्या १९ आहे. तर अन्य कारणांमुळे शाळाबाह्य बालकांची संख्या १४ आहे.

सर्वाधिक शाळाबाह्य मुले भंडारा तालुक्यातविशेष बाल विकास योजनेचा लाभ घेत १८ वर्षे वयोगटातील शाळाबाहा शोधमोहीम रावविण्याचे ठरविले आहे. सर्वाधिक शाळाबाह्य विद्यार्थी भंडारा तालुक्यात आहे. कोविडमुळे शाळेत न गेलेल्या इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थीची संख्या ६३ हजार ११४ इतकी आहे. कोविडनंतर  पाल्यांना नियमित-पणे शाळेत पाठवित असलेल्या पालकांची संख्या १ लक्ष १९ हजार ४०४ आहे. कोविडमुळे इयत्ता ९ वी ते १२ वीचे १३ हजार ३१७ विद्यार्थी शाळेत जाऊ शकले नाही. जिल्ह्यात ३ ते ४ वयोगटातील दोन लक्ष ४४ हजार ४३२ बालके आहेत.

दहा दिवस चालली शोधमोहीमशाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबविण्यासाठी जिल्ह्यातील संपूर्ण शिक्षण विभागातील यंत्रणा कामाला लागली होती. १० दिवस सतत दालेल्या सर्वेक्षणात शिक्षक व अन्य बरेचसे कर्मचारी शोधमोहीम राबवीत होते. यात उच्च माध्यमिक शिक्षक अंगणवाडी सेविका मदतनीस यांचेही  सहकार्य मिळाले.

शाळा बंद न ठेवता विद्याथ्यांचे अध्ययन अध्यापन प्रभावित होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. कुटुंबाची शाळाबाह्य शोधमोहीम करीत असताना शिक्षकांनी व अन्य कर्मचारी यांनी एकत्रितपणे सर्वेक्षण केले आहेत. दैनिक आढावा कळविण्यात आला आहे.- मनोहर बारस्कर, शिक्षणाधिकारी, (प्राथ.) जिल्हा परिषद भंडारा

 

टॅग्स :SchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र