भरधाव कार झाडावर आदळली; एक तरुण ठार, चार जखमी, दसऱ्याच्या दिवशी गावावर शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2021 18:32 IST2021-10-15T18:31:12+5:302021-10-15T18:32:06+5:30

भंडारा : छत्तीसगढ राज्यातील डोंगरगढ येथे देवीच्या दर्शनासाठी जाताना भरधाव कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात मोहाडी तालुक्यातील निलज बुज ...

One youth killed, four injured in Car Accident in Bhandara | भरधाव कार झाडावर आदळली; एक तरुण ठार, चार जखमी, दसऱ्याच्या दिवशी गावावर शोककळा

भरधाव कार झाडावर आदळली; एक तरुण ठार, चार जखमी, दसऱ्याच्या दिवशी गावावर शोककळा

भंडारा : छत्तीसगढ राज्यातील डोंगरगढ येथे देवीच्या दर्शनासाठी जाताना भरधाव कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात मोहाडी तालुक्यातील निलज बुज येथील एक तरुण ठार, तर चार जण गंभीर जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता गोंदिया जिल्ह्यातील सरांडी येथे राष्ट्रीय महामार्गावर घडला. दसऱ्याच्या दिवशी झालेल्या या अपघाताने निलज गावावर शोककळा पसरली.

नीलज येथील पाच मित्र डोंगरगढ येथे कारने जात होते. चालकाचे संतुलन बिघडल्याने कार झाडावर आढळली. त्यात रुपचंद पचघरे (36)  हा जागीच ठार झाला. तर संतोष महादेव पचघरे (26), अक्षय माटे (26), गुड्डू कांबळे (30) व निलेश बांते गंभीर जखमी झाले. तिघांना शासकीय रुग्णालय भंडारा येथे हलविण्यात आले व  निलेशला गोंदिया येथे हलविण्यात असल्याचे सांगितले.

Web Title: One youth killed, four injured in Car Accident in Bhandara