सुयाेगनगरात आंब्याच्या झाडावरून पडून एकजण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:24 IST2021-06-11T04:24:48+5:302021-06-11T04:24:48+5:30

कृष्णकुमार आसाराम भिवगडे (वय ५६) असे मृताचे नाव आहे. त्यांच्या सुयाेग नगरातील घरी आंब्याचे झाड आहे. आंबे ताेडण्यासाठी बुधवारी ...

One killed after falling from a mango tree in Suyaganagar | सुयाेगनगरात आंब्याच्या झाडावरून पडून एकजण ठार

सुयाेगनगरात आंब्याच्या झाडावरून पडून एकजण ठार

कृष्णकुमार आसाराम भिवगडे (वय ५६) असे मृताचे नाव आहे. त्यांच्या सुयाेग नगरातील घरी आंब्याचे झाड आहे. आंबे ताेडण्यासाठी बुधवारी सायंकाळच्या सुमारास ते झाडावर चढले. आंबे ताेडत असताना अचानक फांदी तुटली आणि कृष्णकुमार डाेक्याच्या भारावर खाली काेसळले. त्यात त्यांच्या डाेक्याला जबर दुखापत झाली. तत्काळ त्यांना भंडारा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डाॅक्टरांनी त्यांना मृत घाेषित केले. बुधवारी उत्तरीय तपासणीनंतर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व आई असा परिवार आहे. अचानक घडलेल्या या घटनेने सुयाेग नगरासह शहरात हळहळ व्यक्त हाेत आहे. घरी असलेल्या झाडाचे आंबे ताेडणे या कुटुंबांला चांगलेच महागात पडले. या घटनेची नाेंद भंडारा पाेलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास भंडारा पाेलीस ठाण्याचे उपनिरीक्षक जगणे करीत आहेत.

Web Title: One killed after falling from a mango tree in Suyaganagar