शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

एकाचा मृत्यू, 232 रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2022 05:00 IST

. जिल्ह्यात पाच लक्ष ३७ हजार ७९६ व्यक्तींची कोरोना चाचपणी करण्यात आल्याचे समजते. यात एक लक्ष १८ हजार ८०८ व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यापैकी १८ हजार ८८ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले. तसेच चार लक्ष १८ हजार ७०६ जणांची ॲन्टिजेन तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४८ हजार ६०८ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले आहे. ट्रू नॅट तपासणी २८६ जणांची करण्यात आली. १२३ व्यक्ती बाधित आढळले. 

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सलग आठवड्याभरानंतर कोरोनाने एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत मृत पावलेल्यांची संख्या ११३९ झाली आहे. उल्लेखनीय म्हणजे शुक्रवारी ४०३ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मातही केली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात सक्रीय रुग्णांची संख्या १३८२ वर आली आहे. जिल्ह्यात शुक्रवारी २०७९ नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यापैकी २३२ व्यक्ती कोरोनाबाधित आढळले. तालुकानिहाय आकडेवारीमध्ये भंडारा येथे ८३, मोहाडी ३०, तुमसर २८, पवनी १४, लाखनी ३६, साकोली १९, लाखांदूर २२ रुग्ण आढळले. आतापर्यंत सर्वात जास्त कोरोनाबाधित भंडारा तालुक्यात आढळले असून त्यांची संख्या २७ हजार ४२२ इतकी आहे. त्याचप्रमाणे मोहाडी तालुक्यात आतापर्यंत ५०२४, तुमसर ८३०९, पवनी ६५६७, लाखनी ७८५१, साकोली ८३६९ तर लाखांदूर तालुक्यात ३२७७ रुग्ण आढळून आले आहेत.उल्लेखनीय म्हणजे आतापर्यंत कोरोनाने बाधित रुग्णांची संख्या ६६ हजार ८१९ इतकी असून आतापर्यंत ६४ हजार २९८ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात पाच लक्ष ३७ हजार ७९६ व्यक्तींची कोरोना चाचपणी करण्यात आल्याचे समजते.यात एक लक्ष १८ हजार ८०८ व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यापैकी १८ हजार ८८ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले. तसेच चार लक्ष १८ हजार ७०६ जणांची ॲन्टिजेन तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४८ हजार ६०८ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले आहे. ट्रू नॅट तपासणी २८६ जणांची करण्यात आली. १२३ व्यक्ती बाधित आढळले. सक्रीय रुग्ण संख्येतही भंडारा तालुका आघाडीवर असून तालुक्यात ४२४ व्यक्ती सक्रीय आहेत. तसेच मोहाडी तालुक्यात १३३, तुमसर २२८, पवनी ७३, लाखनी २८१, साकोली १७९, लाखांदूर ६४ रुग्णांचा समावेश आहे. तालुकानिहाय मृत पावलेल्या कोरोना रुग्ण संख्येत भंडारा तालुक्यातील ५२०, मोहाडी १००, तुमसर १२९, पवनी ११३, लाखनी ९९, साकोली १०७ तर लाखांदूर तालुक्यातील ७१ जणांचा समावेश आहे.तिसऱ्या लाटेत आतापर्यंत सहा अजार ७०८ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यापैकी पाच हजार ३२१ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून १३८२ सक्रीय रुग्ण आहेत. तिसऱ्या लाटेत पाच जणांचा मृत्यू झाला असून त्यात मृत्यूदर ०.०७ टक्के आहे. तसेच एकूण मृत्यूसंख्येचा विचार केल्यास मृत्यूदर ०१.७० इतका आहे. तापाची कोणतेही लक्षणे आढळल्यास त्वरीत तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 

 भंडारा झाला कोरोनाचा हाॅटस्पॉट - जिल्ह्यात मागील तीन आठवड्यांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यातच भंडारा आणि तुमसर तालुक्यातील बाधितांचा आलेख सातत्याने उंचावत आहे. भंडारा तालुक्यात सद्य:स्थितीत ४२४ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, तर तुमसर तालुक्यात २२८ रुग्ण आहेत. त्यामुळे भंडारा तालुका कोरोनाचा हाॅटस्पॉट ठरला आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या