शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
4
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
5
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
6
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
7
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
8
Ear Piercing: बाळाचे कान टोचण्यामागची 'ही' वैज्ञानिक कारणे तुम्हाला माहीत आहेत का?
9
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
10
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
11
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
12
४ वेळा SSC, दोनदा UPSC दिली, आजारपणातही जिद्द नाही सोडली, शेतकऱ्याचा मुलगा बनला CBI अधिकारी
13
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
14
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
15
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
16
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
17
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
18
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
19
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
Daily Top 2Weekly Top 5

चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी होणार

By admin | Updated: July 5, 2014 23:23 IST

लाभार्थ्यांना कल्याणकारी योजनांच्या चुकीची माहिती देऊन त्यांची दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी करा, असे निर्देश जिल्हास्तरीय दक्षता व सनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा खासदार

दक्षता समितीची बैठक : नाना पटोले यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देशभंडारा : लाभार्थ्यांना कल्याणकारी योजनांच्या चुकीची माहिती देऊन त्यांची दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी करा, असे निर्देश जिल्हास्तरीय दक्षता व सनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा खासदार नाना पटोले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.जिल्हा परिषद सभागृहात दक्षता व सनियंत्रण समितीचा आढावा घेताना ते बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष वंदना वंजारी, जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक जेजूरकर उपस्थित होते.इंदिरा आवास योजनेचा आढावा घेताना भंडारा जिल्ह्यात अनुसूचित जाती जमातीची प्रतिक्षा यादी संपलेली आहे, अशी चुकीची माहिती अधिकारी लाथार्थ्यांना देतात, ही माहिती पटोले यांना मिळाल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना खडसावले. जिल्ह्यातील गरीबांना घरकुलापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी करू नये, असा समजही त्यांनी दिला.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये मजुरांचे खाते उघडले नसल्याची तक्रार करण्यात आली होती. यावर्षी सर्व मजुरांचे बँक खाते उघडण्यात आले असून त्यांचे वेतन इलेक्ट्रॉनिक्स वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे थेट मजुरांच्या खात्यात जमा होत असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर यांनी दिली. ११ टक्के मजुरांचे वेतन वेळेवर झाले आहे .या योजनेच्या अंमलबजावणीत जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर असून देशात सातव्या क्रमांकावर असल्याची माहितीही त्यांनी यावेळी अध्यक्षांना दिली.महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील ज्या रस्त्यांचे मातीकाम व खडीकरण झाले आहे. मात्र डांबरीकरण झालेले नाही अशा रस्त्यांचा प्रस्ताव तयार करावा. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत अशा कच्च्या रस्त्यांचे डांबरीकरणाचा प्रस्ताव घेण्यात येईल. तसेच कोणकोणत्या मार्गावर पुलांचे बांधकाम करावयाचे आहे याची माहिती सुद्धा एकत्रित करून प्रस्ताव तयार करावा अशा सूचना अध्यक्षांनी संबंधित विभागाला दिल्यात.सर्व विभागांनी त्याच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या कामाचा अजेंडा तयार करावा. तसेच जिल्ह्याची राष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण करण्यासाठी काम करावे, असे निर्देश नाना पटोले यांनी या बैठकीत दिले. या बैठकीला सर्व पंचायत समिती सभापती, विभागप्रमुख, तहसीलदार, खंडविकास अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.