शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

आता, सट्टा व्यवसाय 'आॅनलाईन'

By admin | Updated: November 8, 2014 22:32 IST

दिवसाढवळ्या चौकात वर्दळीच्या ठिकाणी सुरू असलेला सट्टा व्यवसाय काही अंशी लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर बंद झाला असला तरी सट्टा किंगने शक्कल लढवून आॅनलाईन

पानटपरीवर छुप्या मार्गाने सुरू : पोलिसांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्षलाखांदूर : दिवसाढवळ्या चौकात वर्दळीच्या ठिकाणी सुरू असलेला सट्टा व्यवसाय काही अंशी लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर बंद झाला असला तरी सट्टा किंगने शक्कल लढवून आॅनलाईन सट्टा व्यवसायाकडे आपले लक्ष केले आहे. पानटपरीवर छुप्या मार्गाने हा व्यवसाय सुरूच आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केला जात आहे.लोकमत वृत्तपत्रात सट्ट्यातील गुंतवणुकीने गाठला कळस या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित होताच सट्टा चालविणारे एजंट व सट्टा किंगचे चांगलेच धाबे दणाणले. दुसऱ्या दिवशी पानटपऱ्यावर सुरू असलेला सट्टा व्यवसाय बंद दिसत असला तरी छुप्या मार्गाने हा व्यवसाय पोलिसांच्या डोळ्यादेखत काही प्रमाणात सुरूच होता. यासाठी एजंटांनी भ्रमणध्वनीवरून सट्टा व्यवसाय सुरूच ठेवल्याचा प्रकार चर्चेत होता. लोकमत वृत्तपत्राणे अवैध धंदे बंद करण्यासंदर्भात सुरू केलेली नागरिक व वाचक वर्गात चांगलीच चर्चेत असून सट्टा व्यवसाय कायमचा बंद झाला पाहिजे, अशी प्रतिक्रिया 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केली. तालुक्यात दोन सट्टा खावल असून विरली बु व लाखांदूर येथून सट्ट्याचे सुत्र चालतात. एकीकडे २३ तर दुसऱ्याकडे त्याहीपेक्षा जास्त एजंटांची नेमणूक करून वेळेचा आत हा व्यवसाय तेजोत सुरू असताना सध्या छुप््या मार्गाने सुरू आहे.बारव्हा व बोथली भागात सध्या हा व्यवसाय सुरू असताना दिघोरी पोलीस स्टेशनच हद्दीत हे दोन्ही गाव येत असताना अद्याप कार्यवाही शुन्य दिसत आहे. लाखांदूर येथे पंचायत समिती परिसर शिवाजी चौक, बाजार समिती परिसरात तसेच शिवाजी विद्यालय परिसरात पानटपरी बंद करून आडोशाला हा व्यवसाय दुसऱ्याही दिवशी दिसून आला. भ्रमणध्वनीवर सट्टा व्यवसाय आता सुरू झाल्याने कार्यवाही कशी व कुणावर करायची प्रतिबंध कसा घालायचा हा पोलिसांपुढे पेच निर्माण झाला आहे.लाखांदूर तालुक्यात सट्टा व्यवसाय जोमात सुरू असला तरी लोकमतने वृत्त प्रकाशित होताच अनेकांनी लोकमतचे आभार मानले. ही प्रक्रिया अशीच सुरू ठेवा, अशी सूचनादेखील केली (तालुका प्रतिनिधी)