शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

आता शाळांना मिळणार मानांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2016 00:40 IST

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी बदल घडविल्या जात असताना आता शाळांचे 'रँकींग' करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

'लूक' बदलणार : जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर होणार स्पर्धाभंडारा : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी बदल घडविल्या जात असताना आता शाळांचे 'रँकींग' करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.यामध्ये रंगाद्वारे शाळांना 'स्वच्छ विद्यालय पुरस्कार' व रँक दिल्या जाणार आहे. त्यामध्ये अव्वल रँकींगसाठी शाळांमध्ये निकोप स्पर्धा राहणार आहे.शाळा स्वच्छ, समृद्ध व आनंददायी व आरोग्यदायी असेल तरच ज्ञानाची आदानप्रदान प्रक्रिया प्रभावी आणि परिणामकारक होत असते. त्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरापर्यत तीन समित्या राहणार आहे. तालुकास्तरावरील समितीमध्ये गटशिक्षणाधिकारी व अन्य सदस्य जिल्हास्तरावरील समितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी व अन्य सदस्य व राज्य समितीमध्ये प्रधान सचिव व अन्य सदस्य राहणार आहे. या समित्यांतर्फे शाळांचे परिक्षण व गुणांकन होणार आहे.पुरस्कारासाठी पाच क्षेत्र व ३९ घटक निश्चित केले आहेत. त्यामध्ये पाण्याची उपलब्धता २२ गुण, शौचालयाची व्यवस्था २८ गुण, हात धुण्याची व्यवस्था २० गुण, देखभाल व्यवस्था १५ गुण, वर्तवणूक बदल व क्षमता व विकास १५ गुण याप्रमाणे गुणांकन राहणार आहे.ज्या शाळांचा प्रारंभ रेटिंग किमान पिवळा असेल अशा शाळांना स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. ग्रामीण विभागात तीन प्राथमिक शाळा, तीन माध्यमिक शाळा तसेच प्रत्येक क्षेत्रातील ग्रीन मार्कींग शाळा अशा ३० शाळा पुरस्कारासाठी पात्र असतील. शहरी विभागातील एक प्राथमिक व एक माध्यमिक शाळा तसे प्रत्येक उपक्षेत्रातील ग्रीन स्टार प्राप्त हक प्राथमिक शाळा अशा १० शाळा पुरस्कारासाठी पात्र ठरणार आहे. जिल्हास्तरावर निवड झालेल्या शाळांचा निळा रंग राहणार आहे.या शाळा राज्यस्तरावरील स्पधेर्साठी पात्र ठरणार आहेत. यामध्ये एकूण २० शाळांचा समावेश राहणार आहे. यापैकी १५ ग्रामीण व ५ शहरी शाळांची निवड करण्यात येणार आहे.या स्पर्धेमुळे शाळांचे बाह्यरंग व अंतरंग बदलण्यास मदत होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शाळेविषयीचे आकर्षण वाढण्यास मदत होणार आहे. (नगर प्रतिनिधी) मानांकनाच्या आधारे असेल शाळांचा रंगगुणांकनाच्या आधारावर ९० ते १०० गुण प्राप्त शाळांना हिरवा रंग, ७५ ते ८९ प्राप्त गुण शाळांना निळा रंग, ५१ ते ७४ गुणांच्या शाळांना पिवळा रंग, ३५ ते ५० गुणांच्या शाळांना नारंगी रंग व ३५ पेक्षा कमी गुण असणाऱ्या शाळांना लाल रंग असे मानांकन राहणार आहे.जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा होणार आहे.ज्यांचा रंग पिवळा राहणार आहे त्या शाळांना स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.यात ग्रामीण विभागातील तीन प्राथमिक शाळा व तीन माध्यमिक शाळा तसेच ग्रीन रँकिंग शाळा अशा एकूण ३० शाळा पुरस्कारासाठी पात्र राहतील.