शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आता २४ तासांत वीज जोडणी

By admin | Updated: October 11, 2016 00:37 IST

नवीन वीज जोडणीसाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर मोबाईल अँपच्या सहाय्याने केवळ चोवीस तासात वीज जोडणी कार्यान्वित करण्याची प्रक्रिया...

महावितरणचा उपक्रम : ग्राहकांची ताटकळत राहण्यापासून मुक्तीभंडारा : नवीन वीज जोडणीसाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर मोबाईल अँपच्या सहाय्याने केवळ चोवीस तासात वीज जोडणी कार्यान्वित करण्याची प्रक्रिया महावितरणकडून सुरू करण्यात आली आहे. सध्या यामध्ये राज्यभरातील महावितरणच्या ३६ मंडळांतर्गत ८८ विभागांच्या निवडक कार्यक्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. महावितरणने विकसित केलेल्या मोबाईल अँपद्वारे आता ग्राहक सेवेचा मापदंड निर्माण केला आहे. आतापर्यंत राज्यात जुलै २०१६ पासून म्हणजे अवघ्या दोन महिन्यात १,२२८ ग्राहकांना चोविस तासात वीज जोडणी देण्यात आली आहे. आता या योजनेला गती मिळत असून ग्राहकांकडूनही अधिक प्रतिसाद मिळत असल्याची माहिती महावितरणकडून सांगण्यात येत आहे.ज्या भागात नवीन वीज जोडणीसाठी अतिरिक्त वीजयंत्रणा उभारण्याची गरज नाही अशा भागातील तब्बल १५० पेक्षा अधिक उपविभागांच्या कार्यक्षेत्रात महावितरणकडून ग्राहकाला चोवीस तासांत नवीन वीज जोडणी उपलब्ध होणार आहे. याबाबत सबंधित परिमंडळ, मंडळ, विभाग व उपविभाग, शाखा कार्यालय यांची नावे महावितरणच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. घरगुती आणि वाणिज्यक वर्गवारीच्या सिंगल किंवा थ्रीफेजच्या नवीन वीज जोडणीसाठी सबंधित ग्राहकाची थकबाकी नसल्यास व दिलेल्या कोटेशनच्या रकमेचा भरणा केल्यास चोवीस तासांत संबंधित ग्राहकाला वीज जोडणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नवीन जोडणीसाठी इंटरनेटद्वारा महावितरणच्या संकेतस्थळामार्फत आणि अँपच्या माध्यमातून अर्ज स्वीकारणे सुरू आहे. वीज जोडणी देण्याची संपूर्णअंतर्गत प्रक्रिया महावितरणने अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आॅनलाईन करणे अनिवार्य केले आहे. तसेच नवीन वीजजोडणी देण्याची प्रक्रिया थेट वीज जोडणीच्या ठिकाणाहूनच करता यावी यासाठी स्वतंत्र मोबाईल अँपची निर्मिती केली आहे. त्यामुळे नवीन वीज जोडणीसाठी अर्जप्राप्त होताच त्याबाबत कार्यालयीन, तांत्रिक व अन्य माहितीची नोंद महावितरणच्या प्रणालीत आॅनलाईन करण्याची सोय अभियंता व कर्मचाऱ्यांना या अँपद्वारा आता शक्य झाले आहे. ग्राहक आणि सबंधित कर्मचारी दोघांचेही काम अँपमुळे हलके झाले असून चोवीस तासात वीज जोडणी उपक्रमामध्ये अँप महत्वाची भूमिका बजावित आहे. या सुविधेमुळे ग्रामीण तथा शहरी भागातील नविन वीज जोडणीधारकांना दिलासा मिळाला आहे. (शहर प्रतिनिधी)नागरिकांचा वाचणार त्रास पूर्वी वीज जोडणीसाठी अर्ज केल्यानंतर महिनोंमहिने वीज वितरणच्या कार्यालयात ग्राहकाला येरझारा माराव्या लागत होत्या. आता मात्र हा त्रास वाचणार आहे. परंतु यामध्ये काही अटी टाकण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी वीजजोडणी देण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक त्या सोयीसुविधा तयार आहेत. अशा परिसरातील वीज जोडणीचा आॅनलाईन अर्ज असल्यास चोविस तासात वीजजोडणी देण्यात येते. विनाकारण ग्राहकांची अडवणूक होऊ नये, हा त्यामागील हेतू आहे. परंतु ज्या ठिकाणी वीज जोडणी देण्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सोयीसुविधांचा अभाव आहे, सर्विस लाईनच नाही, अशा ठिकाणी मात्र चोविस तासात वीज जोडणी देता येणे शक्य नसल्याने महावितरणने स्पष्ट केले आहे.