शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

आता थकबाकीदार ठरणार मतदानास अपात्र

By admin | Updated: November 29, 2014 00:41 IST

सहकारी संस्थांच्या निवडणुकीत सभासद थकबाकीदार नसावा ही अट आतापर्यंत केवळ उमेदवार तसेच निवडून आल्यावर सदस्यत्व कायम ठेवण्यासाठी बंधनकारक होती.

शिवशंकर बावनकुळे साकोली सहकारी संस्थांच्या निवडणुकीत सभासद थकबाकीदार नसावा ही अट आतापर्यंत केवळ उमेदवार तसेच निवडून आल्यावर सदस्यत्व कायम ठेवण्यासाठी बंधनकारक होती. आता त्यात बदल झाला असून थकबाकीदारांना यापुढे सहकारी संस्थांच्या निवडणुकीत मतदानही करता येणार नाही. सहकारी क्षेत्रातील बहुचर्चित ९७ व्या घटनादुरुस्तीनुसार हा बदल करण्यात आला असून आता थकबाकीदाराला या बदलाचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. सहकार कायद्यानुसार यापूर्वी सहकारी थकबाकीदार व बिगर थकबाकीदार सभासदांना मतदानात भाग घेण्याचा अधिकार होता. संबंधित संस्थेची थकबाकी असणाऱ्या सभासदांना निवडणुकीत उमेदवारीसाठी अपात्र मानले जात होते. निवडून आल्यावर थकबाकीदार सभासदाचे संचालकपद रद्द केले जात होते. या परिस्थितीत इच्छूक व संचालकपद रद्द केले जात होते. या परिस्थितीत इच्छूक व संचालकांच्या कर्जाचे हप्ते नियमित फेडण्याकडे कल राहत असे. परंतु कुटुंबातील सदस्य किंवा सगेसोयरे असलेल्या सभासदांकडील थकबाकीसाठी आग्रही राहत नसत. अशा थकबाकीदारांचा मतदानाचा अधिकार कायम राहत असल्याने त्यांच्या मदतीने संबंधित संस्था आपल्या अधिपत्याखाली ठेवणेही बऱ्याच संस्थाचालकांना साध्य होत असे. आता नव्याने लागू झालेल्या नियमांना मात्र थकबाकीदारांच्या मदतीने विशेषत: विविध कार्यकारी सेवा पतसंस्था, सहकारी संस्था ताब्यात ठेवण्याच्या प्रकारांना चाप बसणार आहे.९७ व्या घटनादुरुस्तीनुसार झालेल्या या बदलानुसार सहकारी संस्थेकडून कर्ज घेतलेल्या सभासद जर थकबाकीदार झाला तर त्यास कामकाजात भाग घेण्याचा आणि मतदानाचा हक्क असणारा नाही. या तरतुदीनुसार यापूर्वी मुदतवाढ मिळालेल्या तसेच ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत मुदत संपणाऱ्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या दृष्टीने सहकार खात्यातर्फे मतदार याद्या अद्यावत करण्याचे काम सध्या सुरु झाले आहे. यादी करताना संबधित संस्थांच्या माध्यमातूनच थकबाकीदारांना त्याचविषयी अवगत करणारी नोटीस धाडण्यात आली आहे. विहित वेळेत थकबाकीचा भरणा न केल्यास थकबाकीदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार नाहीत असा इशाराही या नोटीसाद्वारे देण्यात आला आहे.