शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
3
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
4
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
5
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
6
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
7
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
8
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
9
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
10
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
11
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
12
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
13
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
14
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
15
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
16
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
17
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
18
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
19
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
20
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय

डेंग्यूला दूर ठेवण्यासाठी प्रतिबंधक उपायाची गरज

By admin | Updated: September 13, 2014 23:40 IST

डेंग्यू हा आजार पहिल्यांदा चीती जीत राजवंशात आढळला. १७ व्या शतकात डेंग्यूची साथ आली होती. आशिया, आफ्रिका व उत्तर अमेरिका खंडात डेंग्यूमुळे जीवित हानी झाली होती. अशा या जीवघेण्या आजाराला

मोहाडी : डेंग्यू हा आजार पहिल्यांदा चीती जीत राजवंशात आढळला. १७ व्या शतकात डेंग्यूची साथ आली होती. आशिया, आफ्रिका व उत्तर अमेरिका खंडात डेंग्यूमुळे जीवित हानी झाली होती. अशा या जीवघेण्या आजाराला दूर ठेवण्यासाठी गावागावांत जनजागृती झाली पाहिजे. डेंग्यू रोगाच्या संबंधी ग्रामीण व शहरी भागात कमी जागृतीमुळे डेंग्यू आजाराचा उद्रेक झाला आहे. हा उद्रेक थांबविण्यासाठी मोठ्या प्रमाणात जागृती व तेवढीच प्रतिबंधक उपायाची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्याध्यापक राजकुमार बांते यांनी केले.महात्मा जोतिबा फुले हायस्कूल मोहगाव देवी येथे डेंग्यू आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळी मुख्याध्यापक आर.वाय. बांते बोलत होते. कार्यक्रमाला प्राथमिक आरोग्य बेटाळाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्षशेट्टीवार, सरपंच राजेश लेंढे, सहायक शिक्षक धनराज वैद्य, गजानन वैद्य, शोभा कोचे, आरोग्य सहायक चोपकर, कारेमोरे, सुखदेवे, शिंदे, बंसोड, वर्षा ढोमणे यांची उपस्थिती होती. यावेळी सकाळी जिल्हा परीषद केंद्रीय पूर्व माध्यमिक शाळा, महात्मा जोतिबा फुले हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची गावात जनजागृती रॅली काढण्यात आली. केंद्रीय शाळेने गटागटाने घरांना भेटी देवून डास व अळीची पाहणी केली. महात्मा जोतिबा फुले हायस्कूलच्या प्रांगणात डेंग्यू आजार कसा होतो, याविषयी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी डॉ. लक्षशेट्टीवार, विज्ञान शिक्षक शोभा कोचे, डी.एम. वैद्य यांनी डेंग्यू तापाचे लक्षणे, डेंग्यू आजाराचा प्रसार व त्याच्यावर प्रतिबंधक उपाय काय केले पाहिजे यावर मार्गदर्शन केले. प्राथमिक आरोग्य केंद्र बेटाळाच्या वतीने घरांचे सर्वेक्षण करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन हेमराज राऊत यांनी तर आभार प्रदर्शन हंसराज भडके यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोहन वाघमारे, श्रीहरी पडोळे यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)