शहरं
Join us  
Trending Stories
1
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
2
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
3
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
4
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
5
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
6
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
7
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
8
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
9
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
10
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
11
IPL फायनल दरम्यान PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी भारतात येणार? जाणून घ्या ही चर्चा रंगण्यामागचं कारण
12
"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
13
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
14
गजलक्ष्मी-गजकेसरी योगात अधिक मास २०२६: ९ राशींचे कल्याण-मंगल, पद-पैसा वाढ; महिनाभर अपार लाभ!
15
भयंकर! निळ्यानंतर आता 'हिरव्या ड्रम'ची दहशत; पतीसोबत मिळून पत्नीने केली प्रियकराची हत्या
16
NHAI मध्ये उपव्यवस्थापक पदांची भरती; १ लाख ७७ हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या पात्रता
17
अरे देवा! साता जन्माची साथ १६ दिवसांत सुटली; नवरी ७२ हजार आणि सोन्याचे दागिने घेऊन पळाली
18
आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या 'अरबी'ला इंग्रजीत काय म्हणतात? ९०% लोक देतात याचे चुकीचे उत्तर! तुम्हाला माहितीये?
19
हा ब्लश नाही, महिलांना होणारा गंभीर आजार आहे; लुपस विकार ज्याने गर्भपातही होऊ शकतो
20
बालेन शाह सरकारला नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका! पंतप्रधानांनाचा 'तो' मनमानी निर्णय रद्द
Daily Top 2Weekly Top 5

विषबाधा झालेल्या रोहणीच्या भाविकांची प्रकृती धोक्याबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 05:00 IST

लाखांदूर तालुक्यातील रोहणी येथील गुरूदेव सेवा मंडळाच्यावतीने भागवत सप्ताह आणि ग्रामगीता वाचन कार्यक्रमाचे आयोजन ३१ डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत केले होते. केशव महाराज भोंडे यांनी भागवत कथेचे वाचन केले. रविवारी समारोपीय कार्यक्रम आयोजित होता. काल्याच्या कीर्तनानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कुडेगाव, रोहणी, गवराळा, किरमटी, दोनाडा आदी गावातील भाविकांनी महाप्रसाद ग्रहन केला.

ठळक मुद्देमहाप्रसादातून विषबाधा : परिणय फुकेंसह आरोग्य उपसंचालकांची भेट

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : भागवत सप्ताहाच्या सांगता सोहळ्यानिमित्त आयोजित महाप्रसाद कार्यक्रमातून रोहणी येथे विषबाधा झालेल्या सर्व ३०० ही भाविकांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. सध्या कुडेगाव आणि लाखांदूर येथील रुग्णालयात विषबाधितांवर उपचार सुरू असून आमदार डॉ. परिणय फुके, जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे आणि आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल यांनी लाखांदूरला भेट देऊन विषबाधितांवर योग्य उपचार करण्याचे निर्देश आरोग्य यंत्रणेला दिले आहे.
लाखांदूर तालुक्यातील रोहणी येथील गुरूदेव सेवा मंडळाच्यावतीने भागवत सप्ताह आणि ग्रामगीता वाचन कार्यक्रमाचे आयोजन ३१ डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत केले होते. केशव महाराज भोंडे यांनी भागवत कथेचे वाचन केले. रविवारी समारोपीय कार्यक्रम आयोजित होता. काल्याच्या कीर्तनानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कुडेगाव, रोहणी, गवराळा, किरमटी, दोनाडा आदी गावातील भाविकांनी महाप्रसाद ग्रहन केला.
रात्री ८ वाजेपर्यंत परिसरातील शेकडो भाविकांनी महाप्रसाद घेतला. दरम्यान सोमवारी पहाटेपासून काही जणांना पोटदुखी, हगवण, उलटीचा त्रास सुरू झाला. त्यांना कुडेगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु एकापाठोपाठ एक अनेक रुग्ण येवू लागले. अनेक रुग्णांना लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. तर रोहणी येथेही आरोग्य शिबिर सुरू करण्यात आले.
सध्या सर्व विषबाधीत भाविकांची प्रकृती धोकादायक असून अनेकांना सुट्टी देण्यात आली आहे. तर लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात ६२, कुडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात २२ आणि रोहणी येथील ग्रामपंचायत सभागृहात लावलेल्या शिबिरात २० जणांवर उपचार सुरू आहे. लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात डॉ. सुनील रंगारी, डॉ. राहूल बोरकर, डॉ. महेश नाकाडे, डॉ. अनुजा भुसारी, डॉ. संदीप तिडके, डॉ. श्रीराम राजुरे, डॉ. मेश्राम रुग्णांवर उपचार करीत आहेत. सहायक अधीक्षक प्रवीण नगरारे, रमेश धुर्वे, जयश्री बन्सोड, कर्मचारी नाना भेंडारकर, पंकज दखने, दिनेश तोमसकर आदी मदत करीत आहेत.
या घटनेची माहिती होताच आमदार डॉ. परिणय फुके यांनी थेट लाखांदूरचे ग्रामीण रुग्णालय गाठले. तेथे रुग्णांची विचारपूस केली. तसेच उपस्थित आरोग्य यंत्रणेला योग्य उपचार करण्याचे निर्देश दिले. यासोबतच त्यांनी कुडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि रोहणी येथे उपचार घेणाऱ्या रुग्णांची भेट घेतली. आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल यांनीही लाखांदूर येथे भेट दिली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते आणि जिल्हाधिकाऱ्यांचे पथक लाखांदूर येथे तळ ठोकून आहे. रुग्णालयाला जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, जिल्हा परिषद सदस्य प्रणाली ठाकरे, नगराध्यक्ष भारती दिवठे, तहसीलदार संतोष महल्ले, डॉ. निखिल डोकरीमारे यांनी भेटी दिल्या.

विधानसभा अध्यक्षांचे निर्देश
विषबाधेच्या घटनेची माहिती विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना देण्यात आले. त्यांनी तात्काळ आरोग्य प्रशासनाला निर्देश देत तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. तसेच प्रत्येक रुग्णावर योग्य उपचार करण्यासही सांगितले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल