शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
5
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
6
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
7
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
8
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
9
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
10
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
11
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
12
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
13
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
14
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
15
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
16
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
17
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
18
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
19
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
20
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
Daily Top 2Weekly Top 5

कुट्टू पारधीच्या कबुलीनंतर उलगडले वाघाच्या हत्येचे रहस्य

By admin | Updated: April 21, 2017 00:42 IST

वाघांच्या शिकारीकरिता कुप्रसिद्ध तस्कर कुट्टू पारधी ने सीबीआय व मेळघाट सायबर सेलला वायगाव जंगलातील वाघाच्या हत्येची कबुली दिली नसती तर

प्रकरण वायगाव जंगलातील : ‘जय’चा थांगपत्ता नाहीपवनी : वाघांच्या शिकारीकरिता कुप्रसिद्ध तस्कर कुट्टू पारधी ने सीबीआय व मेळघाट सायबर सेलला वायगाव जंगलातील वाघाच्या हत्येची कबुली दिली नसती तर हे गुढच राहिले असते. येथे वनविभागाला व कोणालाही कुट्टू पारधीची टोळी येथे येऊन राहिली व या टोळीने वाघाची हत्या केली , याबाबत काहीही माहिती नव्हती. दोन वर्षानंतर वाघाच्या हत्येची घटना उघडकीस आली होती.जंगलात वाघांना मारण्यासाठी शिकारी शिरल्याची माहिती मिळाल्यामुळे एप्रिल मे २०१३ मध्ये ताडोबा अंधारी, नवेगाव, नागझिरा, पेंच, मेळघाट आदी व्याघ्र प्रकल्पात व अभयारण्यात रेड अलर्टची घोषणा करण्यात आली होती. कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. कुट्टू पारधीच्या टोळीने ओळखले होते की या जंगलात गेलो तर आपण पकडले जाऊ. त्यामुळे ही टोळी वाघाच्या शिकारीसाठी सुरक्षित जंगलाचा शोध घेत होती.पवनीच्या वनक्षेतातील जंगलात अनेक वाघ असल्याची माहिती कुट्टू पारधीला मिळाल्याची शक्यता होती. येथील जंगलाची संपूर्ण माहिती घेऊनच हे जंगल वाघाच्या हत्येसाठी सुरक्षित असल्यामुळे या जंगलाची निवड केली होती. ही टोळी पवनी परिसरात अनेक दिवस थांबली होती. तेथेच त्यांनी वाघाच्या हत् येची योजना तयार केली होती. सर्व व्याघ्र प्रकल्पात व अभयारण्यात कडक सुरक्षा व्यवस्था होती. पण येथील जंगलात काहीही सुरक्षा व्यवस्था नव्हती. कोणीही अनोळखी व्यक्ती जंगलात जावू शकत होता. यामुळेच कुट्टू पारधीची टोळी या जंगलात वाघाची शिकार करण्यात यशस्वी ठरली होती. सीबीआयने कुट्टू पारधीला अटक केल्यामुळे वाघाच्या हत्येचे गुढ उकलले गेले. २०१३ मध्ये येथील जंगलात अनेक वाघ होते. प्रसिद्ध जय वाघाचे याच काळात आगमन झाले होते. या वाघाच्या हत्येपासून वनविभागाने काही बोध घेण्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)