मदतीसाठी राजेगाववासीयांचे आंदाेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 05:00 AM2020-12-12T05:00:00+5:302020-12-12T05:00:13+5:30

गत तीन वर्षांपासून ग्रामस्थ तथा संघर्ष समितीचे पदाधिकारी अशाेक लेलँड कारखान्याकडून टॅक्स आणण्यासाठी अनेकदा आंदाेलन करुन महत्वाची भुमिका बजावली. त्यामुळे ग्रामपंचायतच्या फंडात रक्कम आहे. ग्रामस्थ काेराेना संकट व शेतीच्या नापिकीमुळे संकटात सापडलेल्या ग्रामस्थांना ग्रामपंचायतच्या वतीने मदत करण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांतर्फे कुंजन शेंडे यांनी प्रशासक टी. आर. बाेरकर व ग्रामसेविका एस. एस. चाेपकर यांच्याकडे केली.

Movement of Rajegaon residents for help | मदतीसाठी राजेगाववासीयांचे आंदाेलन

मदतीसाठी राजेगाववासीयांचे आंदाेलन

Next

  लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : काेराेना संकट व शेतीव्दारे नापिकीमुळे ग्रामस्थ संकटात आहेत. त्यांना ग्रामपंचायतच्या फंडातून मदत करण्यात यावी, या मागणीसाठी राजेगाववासीयांनी केलेल्या आंदाेलनानंतर प्रत्येक कुटुंबाला वस्तुच्या रुपात मदत करण्यात येईल, असे आश्वासन प्रशासक व ग्रामसेविकांनी दिले.
गत तीन वर्षांपासून ग्रामस्थ तथा संघर्ष समितीचे पदाधिकारी अशाेक लेलँड कारखान्याकडून टॅक्स आणण्यासाठी अनेकदा आंदाेलन करुन महत्वाची भुमिका बजावली. त्यामुळे ग्रामपंचायतच्या फंडात रक्कम आहे. ग्रामस्थ काेराेना संकट व शेतीच्या नापिकीमुळे संकटात सापडलेल्या ग्रामस्थांना ग्रामपंचायतच्या वतीने मदत करण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांतर्फे कुंजन शेंडे यांनी प्रशासक टी. आर. बाेरकर व ग्रामसेविका एस. एस. चाेपकर यांच्याकडे केली. मात्र या मागणीकडे ग्राम प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत हाेते. अखेर शुक्रवारी कुंजन शेंडे यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायतीवर धडक माेर्चा काढण्यात आला. जाेपर्यंत मागण्या मंजूर हाेणार नाही, ताेपर्यंत आंदाेलन सुरुच ठेवण्याचा इशारा आंदाेलनकर्त्यांनी दिला. परिस्थिती चिघळण्याची शक्यता असल्याने पाेलिसांना पाचारण करण्यात आले. अखेर प्रशासक व ग्रामसेविकांनी नियमाप्रमाणे गावातील प्रत्येक कुटुंबाला समान मदत म्हणून तीन ते चार हजार रुपये प्रमाणे जे निकष असतील त्याप्रमाणे निधीतून खर्च करता येईल, म्हणजेच प्रत्येक कुटुंबाला वस्तुच्या रुपात मदत देऊ असे मान्य केले. आंदाेलनात अध्यक्ष शशिकांत भाेयर, अचल मेश्राम, अनिता शेंडे,  तुकाराम झलके, शालीक गंथाडे, भानुदास सार्वे, देवराम गणविर, नरेश शेंडे, अशाेक शेंडे, आनंदराव गंथाडे, मनाेहर सार्वे, शिवराम शेंडे, रेखा वासनिक, यशाेदा बाेरकर, उषा शेंडे, अनुसया नागदेवे आदींचा समावेश होता

Web Title: Movement of Rajegaon residents for help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.