शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
8
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
9
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
10
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
11
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
12
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
13
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
14
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
15
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
17
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
18
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
19
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
20
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
Daily Top 2Weekly Top 5

लोककलावंतांचा जिल्हा कचेरीवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 05:00 IST

मोर्चाचे नेतृत्व सामाजिक चळवळीचे नेते परमानंद मेश्राम, संघटनेचे अध्यक्ष भावेश कोटांगले यांनी केले. मोर्चाला दुपारी १२ वाजता विश्रामगृह येथून प्रारंभ करण्यात आला. मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकला. येथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. सभेला परमानंद मेश्राम, भावेश कोटांगले व पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देआर्थिक पॅकेजची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना संकट काळात लोक कलावंतावर उपासमारीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे लोक कलावंतांना आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात यावे, त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करण्यात यावे या मागणीसाठी प्रतीभावंत प्रबोधनकार कलासाहित्य संघटना शाखा भंडारा, गोंदियाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
मोर्चाचे नेतृत्व सामाजिक चळवळीचे नेते परमानंद मेश्राम, संघटनेचे अध्यक्ष भावेश कोटांगले यांनी केले. मोर्चाला दुपारी १२ वाजता विश्रामगृह येथून प्रारंभ करण्यात आला. मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकला. येथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. सभेला परमानंद मेश्राम, भावेश कोटांगले व पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील कलावंत हजारो वर्षांची संगिताची व कला कौशल्यांची वैभवशाली परंपरा जोपासण्यासाठी समाजप्रबोधनाच्या माध्यमातून कार्य करीत आहेत. त्यामुळे त्यांना आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात यावे, सांस्कृतीक कार्यक्रम सुरू करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. दुपारी ४ वाजतानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेवून चर्चा केली. त्यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना सोपविण्यात आले. सदर मागण्या मंजूर न झाल्यास लवकरच संघटनेच्या माध्यमातून सांस्कृतीक मंत्र्यांच्या घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला.

गीतातून मांडल्या व्यथा
मोर्चाच्या सुरूवातीला उपस्थित मोर्चेकरांनी गीत गायनातून व्यथा मांडल्या. अनेकांचे मोर्चाकडे लक्ष वेधून घेतले. अरुण भेदे, प्रकाश तितीरमारे, सुरेंद्र उके, सुशिल खांडेकर, सोमप्रभू तांदूळ, दीपक लाहोरी, गीता रामटेके, अक्षय मेश्राम यांच्यासह प्रबोधनकार कलासाहित्य संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.