शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
2
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
3
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
4
‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण भिडले! युद्धविराम धुडकावून गोळीबार; हल्ल्यामुळे जहाजाला लागली आग
6
भारताचा दणका अन् चीनचा खोटारडेपणा! १ वर्षानंतर चीनने जगासमोर मान्य केलं ऑपरेशन सिंदूरमधील 'ते' सत्य
7
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
8
लेफ्टिनेंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे CDS, अशी आहे त्यांची कारकीर्द 
9
Dividend Stock: एका शेअरवर ७५ रुपयांचा डिविडंड देतेय 'ही' दिग्गज कंपनी, रेकॉर्ड डेट निश्चित, ब्रोकरेजनं वाढवलं टार्गेट
10
लग्नानंतर २६ वर्षांनी आर. माधवनने सांगितली पुरुषांची 'मन की बात'! पत्नीकडून असतात 'या' अपेक्षा
11
तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास ५० लाख दंड! ट्रायचे कठोर पाऊल; नवीन नियमावलीचा मसुदा जाहीर
12
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
13
Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारच्या एका निर्णयाचा कंपन्यांना मोठा फटका; महिन्याला होतंय ₹३०००० कोटींचं नुकसान
14
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
15
बऱ्याच दिवसांनी दिसला परश्या, पुण्यातील इव्हेंटमध्ये रिंकू-आकाशची हजेरी; नंतर दोघांची धमालमस्ती
16
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
17
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
18
तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?
19
दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
20
बेशिस्त IPL, बीसीसीआय आणि खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स!
Daily Top 2Weekly Top 5

लाखांदुरात मिळणार मोफत पाठ्यपुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:01 IST

वर्ग पहली ते आठवीच्या जवळपास १३ हजार विद्यार्थ्यांना मोफत शालेय पाठ्यपुस्तके मिळणार असल्याची माहिती आहे. सदरची पाठ्यपुस्तके लाखांदूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाअंतर्गत तालुक्यातील सर्वच सहा केंद्राअंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये उपलब्ध केले जाणार आहेत.

ठळक मुद्देपहिली ते आठवीच्या १३ हजार विद्यार्थ्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : शिक्षण विभागाच्या समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत लाखांदूर तालुक्यातील वर्ग पहली ते आठवीच्या जवळपास १३ हजार विद्यार्थ्यांना मोफत शालेय पाठ्यपुस्तके मिळणार असल्याची माहिती आहे. सदरची पाठ्यपुस्तके लाखांदूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाअंतर्गत तालुक्यातील सर्वच सहा केंद्राअंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये उपलब्ध केले जाणार आहेत.
लाखांदूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या व खाजगी अनुदानित एकूण ९५ प्राथमिक शाळा आहेत. २८ माध्यमिक शाळा आहेत. प्राथमिक शाळेमध्ये जिल्हा परिषदच्या ८५, खाजगी अनुदानित १०, तर २८ माध्यमिक शाळा मिळुन एकुण १२३ शाळांमधील वर्ग एक ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय पाठ्यपुस्तके वितरीत केले जाणार आहेत. त्यानुसार इयत्ता पहिलीमधील १४६६ विद्यार्थी, दुसरीतील १६०३ विद्यार्थी, तिसरीतील १६०३ विद्यार्थी, चौथीतील १७५६, पाचवीतील १६४६, इयत्ता सहावीतील १५३१, इयत्ता सातवीतील १६४४ व आठवीतील १६०१, अशी एकुण १२ हजार ८५० विद्यार्थ्यांना मोफत शालेय पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाणार आहे.
दरम्यान, लाखांदूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाअंतर्गत यंदाच्या शैक्षणिक सत्रातील तालुक्यातील विविध १२३ शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तके उपलब्ध होण्यासाठी सर्वच सहाही केद्रांना पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात आला आहे. मात्र कोरोना विषाणुच्या परिस्थितीत लॉकडाऊन असल्याने दरवर्षी २६ जुनला उघडली जाणारी शाळा यावर्षीदेखील विहीत तारखेलाच उघडली जाणार अथवा नाही हे मात्र गुलदस्त्यात असले तरी प्रशासनाकडून लवकरच स्पष्ट होणार आहेत.

टॅग्स :Schoolशाळा