शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
4
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
5
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
6
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
7
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
8
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
9
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
10
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
11
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
12
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
13
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
14
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
15
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
16
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
17
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
18
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
19
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
20
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

रोहयोच्या कामात लाखोंचा गैरव्यवहार

By admin | Updated: March 5, 2016 00:40 IST

केसलवाडा गटग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट तेलपेंढरी, केसलापुरी व सालेवाडा या तीन गावांमध्ये करण्यात आलेल्या मग्रारोहयो, लाखो रूपयांचा गैरव्यवहार उघडकीस आला.

बोगस मजूर, बोगस हजेरी : निधी हडपल्याची कबुली, सरपंच, सचिवाचे कानावर हातअड्याळ : केसलवाडा गटग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट तेलपेंढरी, केसलापुरी व सालेवाडा या तीन गावांमध्ये करण्यात आलेल्या मग्रारोहयो, लाखो रूपयांचा गैरव्यवहार उघडकीस आला. बोगस मजुरांची नावे नोंद करीत बनावट हजेरींच्या आधारे निधी हडपल्याची कबूली खुद्द रोजगार सेवकांनी दिली. याप्रकरणाचा अहवाल पंचायत समितीकडे सादर करण्यात आला असून सखोल चौकशी आणि कारवाईची मागणी करण्यात आली आहे.केसलवाडा गटग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट गावात रोजगार हमी योजनेखाली विविध कामे करण्यात आली. एम.आर. बारसागडे नामक रोजगार सेवकाची गेल्या आठ वर्षापासून या कामावर देखरेख आहे. तथापि, रोहयोच्या कामात मोठा घोळ केला आहे. गावात राहत नसलेल्या व्यक्ती, लग्न होवून सासरी गेलेल्या महिला, बँकेत काम करणारा चपराशी अशांची नावे हजेरी पुस्तीकेवर नोंद करून त्यांच्या नावावरची मजुरी रोजगार सेवक हळप करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या कुटूंबातील सदस्य कामावर नसतानाही बोगस हजेरी दर्शवून प्रत्येक्षात कामावर असणाऱ्यांपेक्षा जास्त मजुरी काढल्याचे दिसून आले. याविरोधात तक्रार करण्याचे कुणी सांगितले तर या मजुरांना कामावरून बंद करण्याची किंवा मजुरी कमी काढण्याची धमकी दिली जायची. रोहयो कामावर हजर मजुरांची नावे एका वहीवर नोंदवायची आणि नंतर घरी जावून बोगस मस्टर भरायचे, असा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मस्टरवरील एम.आय.एस.मध्ये ग्रामसेवक किंवा सरपंचांची स्वाक्षरी आवश्यक असली तरी या दोघांपैकी एकाचीही स्वाक्षरी घेतली गेली नाही. स्वत:च मस्टर मंजुर करून त्याने पैशाची उचलही केली आहे. रोहयोच्या प्रत्येक कामावर सुमारे ३५ मजुरांची बोगस नावे दर्शवून त्याने गेल्या पाच वर्षात लाखो रूपये हळपल्याची माहिती आहे. दरम्यान हे प्रकरण उघड झाल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात चौकशी केली असता रोजगार सेवकाने घोटाळा केल्याची कबूली देत चूक मान्य केली. मात्र राजीनामा देण्यास तो तयार नाही. गेल्या पाच वर्षापासून हा प्रकार सुरू असताना आपल्याला कल्पना नाही, असे ग्रामसेवक आणि सरपंच सांगतात. परंतु हा निधी त्यानेच हडप केला की इतरांचाही संबंध आहे याची चौकशी करण्याची मागणी पुढे येत आहे.चौकशीनंतर प्रकरणाचा अहवाल पंचायत समितीकडे सादर करण्यात आला आहे. सखोल चौकशी आणि दोषींवर कारवाई करीत हळप करण्यात आलेला निधी वसूल करण्याची मागणी ग्रामस्थांसह तक्रारकर्ता बालक गजभिये यांनी केली आहे. (वार्ताहर)