पारा ४२ अंशावर; बाजारावर परिणाम

By Admin | Updated: May 20, 2016 00:48 IST2016-05-20T00:48:02+5:302016-05-20T00:48:02+5:30

रखरखत्या उन्हामुळे सकाळी ९ वाजल्यापासूनच नागरिकांचे घराबाहेर पडणे बंद झाले आहे.

Mercury at 42 degrees; The result on the market | पारा ४२ अंशावर; बाजारावर परिणाम

पारा ४२ अंशावर; बाजारावर परिणाम

भंडारा : रखरखत्या उन्हामुळे सकाळी ९ वाजल्यापासूनच नागरिकांचे घराबाहेर पडणे बंद झाले आहे. यामुळे मुख्य मार्गासह बाजारपेठेतही दुपारच्या सुमारास शुकशुकाट असतो. आठवडी बाजारातही नागरिकांची नगण्य हजेरी असल्याचे दिसून येते.
आज गुरुवारला ४२ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. बुधवारला ४३, मंगळवारला ४४ तर सोमवारला ४५ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. यावर्षी सर्वाधिक तापमान सोमवारला नोंदविण्यात आले. गेल्या चार दिवसांपासून सूर्य आग ओकू लागला आहे. नागरिक १२ ते ५ या वेळेत बाहेर जाणे टाळत आहेत. रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत आहे. रहदारीच्या राष्ट्रीय महामार्गावर दुपारच्या सुमारास शुकशुकाट दिसून येत आहे. दुपारी १२ ते ३ या कालावधीत कुणीही घराबाहेर पडू नये अशा सूचना आपातकालीन नियंत्रण विभागाने दिल्या आहेत. वाढत्या तापमानामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत आहे. उष्माचा त्रास जाणवू लागल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Mercury at 42 degrees; The result on the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.