शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

बाजारातून बैल जातात थेट कत्तलखान्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 6:00 AM

सिहोरा येथील आठवडी बैल बाजारात नजिकच्या मध्यप्रदेशातून जनावरे मोठ्या प्रमाणात विक्री करिता आणली जात आहेत. मध्यप्रदेशात जनावरांच्या मांस विक्रीवर बंदी असली तरी कत्तलखान्यात विक्रीवर कडक निर्बंध घालण्यात आली आहे. परंतू सिमावर्ती गावात यात लवचिकता असल्याने आठवडी बाजारात गाय विक्रीचे प्रमाण अधिक आहे.

ठळक मुद्देसिहोरा येथील प्रकार : पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

राहुल भुतांगे ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : विदर्भात जनावरांच्या खरेदी विक्रीकरिता प्रसिद्ध असणाऱ्या तालुक्यातील सिहोरा येथील शनिवार रोजी आयोजित होणाऱ्या आठवडी बाजारातून थेट कत्तलखान्यात जनावरांची रवानगी होत असल्याचे चित्र आहे. मात्र या प्रकरणात स्थानिक पोलीस प्रशासनाने केवळ बघ्यांची भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.सिहोरा येथील आठवडी बैल बाजारात नजिकच्या मध्यप्रदेशातून जनावरे मोठ्या प्रमाणात विक्री करिता आणली जात आहेत. मध्यप्रदेशात जनावरांच्या मांस विक्रीवर बंदी असली तरी कत्तलखान्यात विक्रीवर कडक निर्बंध घालण्यात आली आहे. परंतू सिमावर्ती गावात यात लवचिकता असल्याने आठवडी बाजारात गाय विक्रीचे प्रमाण अधिक आहे. परिणामी नागपूर, कामठी येथील व्यापारी सिहोरा येथील बाजारात धाव घेत आहेत. स्वस्त दरात जनावरांची खरेदी केल्यानंतर सदर बाजारातून थेट कत्तलखान्यात जाणाºया जनावरांच्या शरीरावर लाल, हिरवा निशात लावले जात आहे.म्हैस या जनावरांना बाजारात आणत असताना या जनावरांना वाहनात कोंबले जाते तर या उलट गाय आणि बैल या जनावरांना वाहनात कोंबले जात नाही. या जनावरांना हरदोली गावाच्या शिवारापर्यंत बैल बाजारातून पायदळे नेले जाते व ते जनावरे पोहचताच तिथे उभ्या असलेल्या ट्रकमध्ये जनावरे कत्तल खान्याकरिता कोंबले जावून जनावरांची रवानगी केली जात आहे. कत्तलखान्यात रवानगी होणाऱ्या जनावरांची सर्वाधिक खरेदी याच बाजारातून केली जात आहे. स्थानिक सिहोरा पोलीस प्रशासनाला या संदर्भात माहिती आहे.याशिवाय परिसरात बजरंग दल शाखा कार्यरत असताना कत्तल खान्यातील जनावरे खरेदी विक्रीच्या व्यवसायावर आडा घालण्याचे प्रयत्न होत नाही. यामुळे जनावरे खरेदी विक्रीच्या व्यवसायात गडबड झाल्याचे चित्र दिसून येत आहे. आठवडी बाजारदिनी जिल्ह्यातील ठिकाणावरचेही पोलीस येथे हजेरी लावताना दिसून येतात. सारे काही आलबेल असल्याचे चित्र आहे. दरम्यान या संदर्भात अनेक तक्रारी करण्यात आल्या. परंतू चौकशी तथा कारवाई अजुनपर्यंत तरी करण्यात आली नाही. यामुळे प्रशासकीय यंत्रणाही या कार्यात सहकार्य करित असल्याचे जाणवते. याशिवाय परिसरात जनावरे खरेदी विक्री बाह्य व्यापार सुरू आहे. कत्तल खान्यात जनावरे विक्री या व्यापाऱ्यातून केली जात आहे. शेतकऱ्यांच्या हिताकरिता बैल बाजार असेल तरी व्यापाºयांचे जाडेच या बाजारात दिसून येत आहे.