शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

रविवारी तब्बल ६४ व्यक्ती कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 05:00 IST

तालुकानिहाय कोरोना बाधितांच्या संख्येवर नजर घातल्यास सर्वाधिक रुग्ण भंडारा तालुक्यात दिसून येत आहे. आतापर्यंत भंडारा तालुक्यात २८०, साकोली ८१, लाखांदूर ३४, तुमसर १०४, मोहाडी १६४, पवनी ५८ तर लाखनी तालुक्यात ९९ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. रविवारी आढळलेल्या ६४ रुग्णांपैकी भंडारा तालुक्यात १५, लाखांदूर तालुक्यात ७, तुमसर ६, मोहाडी १०, पवनीत ७ तर सर्वाधिक रुग्ण लाखनी तालुक्यात १९ रुग्ण बाधित आढळले आहे.

ठळक मुद्देमृत्यू संख्या १३ वर : आतापर्यंत तुमसर १०४, मोहाडी १६४ तर लाखनी तालुक्यात ९९ जण पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाने गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे. शनिवारी २६ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्यानंतर रविवारी तब्बल ६४ रुग्ण बाधीत आढळली आहेत. परिणामी जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ८२० वर पोहोचली आहे. तसेच कोरोनाने मोहाडी तालुक्यातील रहिवासी असलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू कोरोना संसर्गाने झाला आहे. बाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्याचेही दिसून येत आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांच्या संख्येवर नजर घातल्यास सर्वाधिक रुग्ण भंडारा तालुक्यात दिसून येत आहे. आतापर्यंत भंडारा तालुक्यात २८०, साकोली ८१, लाखांदूर ३४, तुमसर १०४, मोहाडी १६४, पवनी ५८ तर लाखनी तालुक्यात ९९ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. रविवारी आढळलेल्या ६४ रुग्णांपैकी भंडारा तालुक्यात १५, लाखांदूर तालुक्यात ७, तुमसर ६, मोहाडी १०, पवनीत ७ तर सर्वाधिक रुग्ण लाखनी तालुक्यात १९ रुग्ण बाधित आढळले आहे.
जिल्हा आरोग्य यंत्रणेकडूनही वाढती रुग्णसंख्या पाहता अधिक जबाबदारी घेतली जात आहे. स्थिती नियंत्रणात असली तरी वाढत्या रुग्णसंख्येने चिंतेत भर घातली आहे. भंडारा शहरातही गत आठवड्याभरात रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर भंडारा शहरात रविवारी फक्त भाजीबाजार वगळता सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे निर्देश पालिका प्रशासनाने दिले होते. याला नागरिकांनीही प्रतिसाद दिला असला तरी व्यापाऱ्यांमध्ये असंतोष व्याप्त आहे.
सकाळी ११ वाजताच्या सुमारास स्थानिक प्रशासन व पोलिस प्रशासनाच्या पथकाने व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास लावली. रविवार हा आठवडी बाजाराचा दिवस असल्याने या दिवशी सर्वात जास्त उलाढाल होत असते. दरम्यान प्रशासनाच्या निर्देशानंतर बंद ठेवण्यात आले असले तरी व्यापाºयांनी यावर नापसंती व्यक्त केल्याचे रविवारला दिसून आले.
जिल्ह्यात आतापर्यंत १ लक्ष १५ हजार ६७८ नागरिकांनी आरोग्य सेतु अ‍ॅप डाऊनलोड करुन त्याचा उपयोग केला आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने ११९६९ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुणे तपासणीसाठी नागपूर येथे पाठविले आहे.

४५७ रुग्ण पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह
जिल्ह््यात एकुण कोरोना बाधितांची संख्या ८२० झाली आहे. यापैकी ४५७ पॉझिटिव्ह रुग्ण निगेटिव्ह होऊन घरी परतले आहेत. रविवारी ११ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आतापर्यंत आयसोलेशन वॉर्डातून १०५८ व्यक्तींना सुटी देण्यात आली आहे. या वॉर्डात आता १७४ व्यक्ती भरती आहेत. जिल्ह्यात अ‍ॅन्टीजेन टेस्ट कीटद्वारे ६१०८ व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये आतापर्यंत २३९ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले आहेत. ५८६९ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तिव्र श्वासदाहचे १८२ व्यक्तींना भरती करण्यात आले आहेत. त्यापैकी नऊ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर १७३ व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आहेत. आरोग्य कर्मचाºयांमार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचे कार्यही सुरु आहे.

आयसोलेशन वॉर्डात एका रुग्णाचा मृत्यू
जिल्हा रुग्णालयातून आयसोलेशन वॉर्डात उपचार सुरु असलेल्या एका ५६ वर्षीय पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाला. सदर व्यक्ती मोहाडी तालुक्यातील रहिवासी असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. परिणामी कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींची संख्या १३ झाली आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या