शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवारचे योग्य नियोजन करा

By admin | Updated: May 18, 2017 00:35 IST

तलावामध्ये दरवर्षी साठत चाललेल्या गाळामुळे तलावाच्या साठवणी क्षमतेत मोठ्या प्रमाणात घट होत आहे.

बैठक : जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांना सूचनालोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तलावामध्ये दरवर्षी साठत चाललेल्या गाळामुळे तलावाच्या साठवणी क्षमतेत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. या तलावामध्ये साठलेला गाळ उपसा करुन शेतात पसरविल्यास तलावाची मुळ साठवण क्षमता पुन:स्थापित होण्याबरोबर कृषी उत्पन्नात भरीव वाढ होणार आहे. ही बाब विचारात घेवून गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार योजना आखली आहे. गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवारचे योग्य नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार योजना राबविण्यासाठी बुधवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उपविभागीय अधिकारी पृथ्वीराज बी. पी. उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले, शिल्पा सोनाले, लघुपाटबंधारे विभाग जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता पी.एस. पराते, उपसंचालक माधुरी सोनोने उपस्थित होते.या योजनेंतर्गत प्रत्येक तालुक्यास १० लाख रुपये निधी देण्यात येणार आहे. तसेच वाढीव खर्च आल्यास वाढीव निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. योजनेत स्थानिक शेतकऱ्यांचा सहभाग आवश्यक असून गावकऱ्यांकडून तलावातील गाळ त्यांच्या शेतामध्ये वाहून नेण्यास तयारी असल्याचे ग्रामपंचायतीद्वारे मागणीपत्र घ्यावे. खाजगी व सार्वजनिक भागीदारी अंतर्गत गाळ उपसण्याकरीता आवश्यक असलेली यंत्रसामुग्री व इंधावरील खर्च शासनाकडून तसेच सीएसआरच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या निधीमधून भागविण्यात यावा. या योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामाचे जीओ टॅगिंग, योजनेची संगणक प्रणालीवर माहिती संकलीत करावी. स्वयंसेवी संस्थांनी गाळ काढण्यास संमती दर्शविल्यास त्यांना जेसीबीसाठी लागणारे इंधनाचा खर्च देण्यात येईल. हा जेसीबीवर होणाऱ्या खचार्चा निधी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून संबंधितांना देण्यात यावा. तसेच आवश्यकता पडल्यास जवाहर नगर आयुध निमार्णीच्या संबंधित कंत्राटदारांकडून सुध्दा सेवा घेवू शकतो, असे ते म्हणाले.ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी जनजागृती करण्यात यावी. तालुकास्तरीय नोडल अधिकाऱ्यांनी शासन निर्णयान्वये दिलेल्या निर्देशाचे काटेकोरपणे पालन करावे. योजेनेंतर्गत नियोजनबध्द काम करा. त्यांचे व्यवस्थित रेकॉर्ड ठेवा, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. या बैठकीस योजनेशी संबंधित सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.