शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय निर्माण करून कुटूंब 'लयभारी' करा

By admin | Updated: September 23, 2016 00:44 IST

प्रत्येक कुटुंबात आई, पत्नी, मुलगी, बहिण, सून आहेत. त्यांच्या प्रतिष्ठेसाठी घरी शौचालय असणे ही अत्यंत आवश्यक बाब आहे.

शिल्पा सोनाले यांचे आवाहन : पवनारखारी येथे समाधान शिबिरात स्वच्छतेची जनजागृतीभंडारा : प्रत्येक कुटुंबात आई, पत्नी, मुलगी, बहिण, सून आहेत. त्यांच्या प्रतिष्ठेसाठी घरी शौचालय असणे ही अत्यंत आवश्यक बाब आहे. घरच्या महिलांची प्रतिष्ठाही कुटूंबांची प्रतिष्ठा असते. ही प्रतिष्ठा प्राप्त करणे, जोपासणे ही कुटूंब प्रमुखांची जबाबदारी आहे. याकरिता कुटूंब प्रमुखांनी पुढाकार घेत प्रत्येक घरी शौचालय निर्माण करून आपले कुटूंब लयभारी करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी केले. कुटूंब संवाद अभियानाच्या माध्यमातून ग्रामपंचायत पवनारखारी येथे स्वच्छतेसाठी भेटीगाठी घेताना कुटूंबातील महिला पुरूषांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.तुमसर पंचायत समिती अंतर्गत ग्रा.पं. पवनारखारी येथे २१ सप्टेंबरला महसूल विभागाच्या वतीने महाराजस्व अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी खंड विकास अधिकारी मनोज हिरूडकर यांचे नेतृत्वात राबविण्यात येत असलेल्या कुटूंब संवाद अभियानाच्या माध्यमातून आयईसी स्टॉल लावून स्वच्छतेसाठी जनगाृती करण्यात आली. गृहभेटी कार्यक्रमाप्रसंगी सरपंच कविता बमचेर, पंचायत समिती सदस्य सयाम, ग्राम विकास अधिकारी भांडारकर, माहिती शिक्षण संवाद सल्लागार राजेश येरणे, गट समन्वयक पल्लवी तिडके, जलसुरक्षक विनोद सयाम, मित्रा संस्था व महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.गृहभेटी करताना कुटूंबाकडे असलेल्या शौचालयाच्या स्थितीनुसार लयभारी, खतरा धोका संदेशाचे स्टिकर्स लावून त्याबाबत स्वच्छतेचे महत्व सांगितले. तसेच त्या घरांना लाल रंगाचे स्टिकर्स लावले त्यांना बांधकाम व वापर करून हिरवा स्टिकर्स लावून कुटूंबांना लयभारी करण्याचे आवाहन केले. सोबतच जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री गिलोरकर यांच्या स्वाक्षरीने असलेले आवाहन पत्र वितरीत करून शौचालयाकरिता पुढाकार घेण्याची विनंती केली. याप्रसंगी सरपंच कविता बमचेर यांनी पवनारखारी गावाची हागणदारीमुक्तीकडे सुरू असलेल्या वाटचाली बद्दल उपविभागीय अधिकारी सोनाले यांना माहिती दिली. (नगर प्रतिनिधी)