शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने हलके धान भुईसपाट

By admin | Updated: October 10, 2016 00:27 IST

मागील काही दिवसांपासून दररोज दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाने कापणीयोग्य हलके धान भुईसपाट झाले आहेत.

भारी धानालाही फटका : कडपांमध्ये शिरले पाणीविरली (बु.) : मागील काही दिवसांपासून दररोज दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाने कापणीयोग्य हलके धान भुईसपाट झाले आहेत. सततच्या पावसामुळे भारी धानही शेतात लोटल्यामुळे या धानालाही फटका बसण्याची शक्यता आहे. परिणामी लाखांदूर तालुक्यात ओल्या दुष्काळाचे सावट पसरले आहे.यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली, शेतकऱ्यांचे रोवणे आटोपले. त्यानंतर पावसाने दिर्घकाळ दडी मारुन डोळे वटारले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले धानपिक वाचविण्यासाठी जीवाचा आटापीटा करुन जमेल त्या पध्दतीने आपल्या धानशेतीला पाणीपुरवठा केला. आता गरज नसतांना बरसणाऱ्या पावसाने डोळ्यात पाणी आणले आहे.या परिसरात मोठ्या प्रमाणात हलक्या धानाची लागवड असून सद्यास्थितीत हे धान परिपक्व झाले आहेत. मात्र गेल्या १५ ते २० दिवसांपासून दररोज हजेरी लावणाऱ्या पावसाने परिपक्व झालेले धान शेतात भुईसपाट झाले असून शेतात साचलेल्या पाण्यामुळे हे धान अंकुरण्याच्या मार्गावर आहेत. काही शेतकऱ्यांनी कडपा पाण्यावर कापणी केली त्याच्या तरंगु लागल्या असून हे धान मातीमोल होत आहेत. दररोजच्या पावसाने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले असून शेतशिवारात चोहिकडे पाणीच पाणी असल्यामुळे हलक्या धान शेतीतील पाणी काढणे दुरापास्त झाले आहेत. परिणामी आता धान वाचविण्यासाठी शेतातील पाणी कसे काढावे या विंवचनेत शेतकरी सापडला आहे.सततच्या पावसामुळे सध्या गर्भावस्थेत असलेले भारी धानही शेतात झोपले असून या धानालाही फटका बसण्याची शक्यता आहे. सद्यास्थितीत दररोज हजेरी लावणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांचे तोंडचा घास हिरावून घेतला असून लाखांदूर तालुक्यावर ओल्या दुष्काळाचे सावट पसरले आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी लाखांदूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)