साकोलीत ग्रामसेवकांचे कामबंद आंदोलन

By Admin | Updated: September 10, 2016 00:37 IST2016-09-10T00:37:11+5:302016-09-10T00:37:11+5:30

पवनी पंचायत समिती येथील ग्रामसेवक दत्ता जाधव यांना मारहाण केल्याप्रकरणी मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्यात यावी,...

Kamoland movement of Sakoli Gramsevak | साकोलीत ग्रामसेवकांचे कामबंद आंदोलन

साकोलीत ग्रामसेवकांचे कामबंद आंदोलन

प्रकरण ग्रामसेवक मारहाणीचे : प्रशासनाला दिला इशारा
साकोली : पवनी पंचायत समिती येथील ग्रामसेवक दत्ता जाधव यांना मारहाण केल्याप्रकरणी मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ तालुका शाखा साकोलीतर्फे ग्रामसेवकांनी पंचायत समिती साकोलीसमोर कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
ग्रामसेवक दत्ता जाधव यांना ग्रामसभेत काही लोकांनी मारहाण केली व शासकीय दस्तऐवज फाडून फेकले. ज्या लोकांनी हे कृत्य केले त्यांना जोपर्यंत अटक करण्यात येत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही ग्रामसेवक संघटनेने दिला आहे. या आंदोलनात संघटनेचे विभागीय अध्यक्ष विलास मुंडे, जिल्हा महासचिव विनोद भेंडारकर, राज्य प्रतिनिधी सुरेश राऊत, तालुका अध्यक्ष रविंद्र खोटेले, एच.एस. लंजे, मिलिंद दरवडे, देवेंद्र खुने, शैलेश लंजे, शैलेश नंदेश्वर, प्रिती राऊत, आरती गेडाम, संगीता मारवाडे, छाया मेश्राम, दर्शना मेश्राम, युवराज तलमले, संजय वाघमोडे, माधव गायकवाड, आर.डी. पटले, प्रदीप चेटुले, हितेस बारस्कर, पी.एम. रामटेके, हिरालाल खंडाईत, भोजराज कोचे, एम.डब्ल्यु. मेंढे, संजय निमुळे, सी.के. मेश्राम, नागसेन मेश्राम, सुरेश हटवार, होमराज लंजे, अशोक ब्राम्हणकर उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Kamoland movement of Sakoli Gramsevak