जरा हटके! भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे भरला ट्रॅक्टरचा पोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 01:37 PM2019-08-30T13:37:46+5:302019-08-30T13:38:30+5:30

भंडारा जिल्ह्यातील पवनीकरांनी पोळ्याचे निमित्त साधत, बैलांसोबत ट्रॅक्टर्सचीही पूजा आज बांधली.

Just different! Tractor worshiped at Pawani in Bhandara district on Pola festival | जरा हटके! भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे भरला ट्रॅक्टरचा पोळा

जरा हटके! भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे भरला ट्रॅक्टरचा पोळा

googlenewsNext
ठळक मुद्दे३० ट्रॅक्टर्स सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : बदलत्या जगानुसार आपल्या रितीभातीही बदलत असल्याचे आपण पाहतो. याचा एक वेगळा अनुभव शुक्रवारी सकाळी भंडारा जिल्ह्यातील पवनी गावातील गावकऱ्यांना आला. पोळा या कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या घटकाचे ऋण मानण्याचा सण. पण आता बैलांची संख्याच दिवसेंदिवस घटत जाते आहे. त्याजागी ट्रॅक्टर दिसू लागले आहेत. पवनीकरांनी पोळ्याचे निमित्त साधत, बैलांसोबत ट्रॅक्टर्सचीही पूजा आज बांधली.
शेती कामात अविभाज्य घटक असलेल्या ट्रॅक्टर्सला छान सजवून गावातून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. सकाळी सजलेले हे ट्रॅक्टर्स एकत्र जमले होते. यात ३० ट्रॅक्टर्स सहभागी झाले. हा आगळावेगळा पोळा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आपली हजेरी लावली.

Web Title: Just different! Tractor worshiped at Pawani in Bhandara district on Pola festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.