शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

उत्सवात सर्वधर्म समभाव जोपासा

By admin | Updated: August 29, 2016 00:23 IST

येणाऱ्या दिवसात पोळा, गणपती, ईद यासारखे अनेक उत्सव येणार असून सण साजरे करताना...

शांतता सभा : उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे प्रतिपादनमोहाडी : येणाऱ्या दिवसात पोळा, गणपती, ईद यासारखे अनेक उत्सव येणार असून सण साजरे करताना सर्व व्यक्तींनी एकोप्याने व सर्वधर्म समभावाने हे सण साजरे करावे. यातून नवा आदर्श स्थापित करावा असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड यांनी मोहाडी पोलीस स्टेशन येथे आयोजित शांतता समिती सभेत व्यक्त केले.या सभेला अध्यक्ष म्हणून तहसीलदार धनंजय देशमुख उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी संजय जोगदंड, ठाणेदार सुहास चौधरी, ओमप्रकाश गेडाम उपस्थित होते. याप्रसंगी गणपती उत्सवात कोणकोणती काळजी घ्यावी, तसेच विसर्जन सायंकाळी सात वाजेपूर्वी करण्यात यावे, विसर्जनाच्या वेळी मंडळाच्या सदस्यांना ओळखपत्र देण्यात यावे, जेणेकरून बाहेरच्या व्यक्तीची ओळख होईल व अप्रिय घटना घडणार नाही. डी.जे. लावण्यात येऊ नये अशा सूचना देण्यात आल्या. तहसीलदार धनंजय देशमुख यांनी एक गाव एक गणपतीची संकल्पना सांगून त्याचे फायदे सांगितले. तसेच उत्सव आनंदाने व गुण्यागोविंदाने साजरे करण्याचे आवाहन केले. सभेला विलास वाडीभस्मे, यशवंत थोटे, सिराज शेख, विनोद नंदनवार, जितेंद्र सोनकुसरे, नईम कुरैशी, बबलू शेख, वामन बोकडे, तंमुस अध्यक्ष सर्व गणपती मंडळाचे अध्यक्ष, सदस्य, पोलीस पाटील जामा मस्जीद कमेटीचे सदस्य उपस्थित होते. संचालन व आभार पोलीस उपनिरीक्षक ओमप्रकाश गेडाम यांनी केले. (शहर प्रतिनिधी)