शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

जनता विद्यालयाची जान्हवी तुमसरे बनवणार लघु उपग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:34 IST

मोहन भोयर तुमसर : डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन आणि स्पेस झोन इंडिया आयोजित ...

मोहन भोयर

तुमसर : डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन आणि स्पेस झोन इंडिया आयोजित स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्ज चॅलेंज २०२१ साठी विद्यार्थ्यांचे विविध गट तयार करून पहिल्यांदाच जागतिक, आशिया आणि भारतीय विक्रमासाठी संधी उपलब्ध करून दिली आहे. याकरिता जनता विद्यालयाची विद्यार्थिनी जान्हवी अरविंद तुमसरे हिची निवड करण्यात आली आहे.

१०० पेलोड उपग्रह बनवून हेलियम बलूनद्वारे अवकाशात नेण्याच्या या प्रकल्पात विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनातच स्पेस टेक्नॉलॉजीची जिज्ञासा निर्माण होऊन भविष्यात स्पेस टेक्नॉलॉजीत हे विद्यार्थी नक्कीच आपले योगदान देतील. सदर विक्रमात नाव कोरण्यासाठी तुमसर येथील जनता विद्यालयाची इयत्ता ७ वीची जान्हवी अरविंद तुमसरे या विद्यार्थिनीची निवड झाली असून, दि. १९ जानेवारीला नागपूरच्या सेंट विन्सेन्ट पल्लोटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे होणाऱ्या प्रात्यक्षिक वर्गास जान्हवी उपस्थित राहणार आहे. पालकांना व शाळा प्रशासनास या उपक्रमाची संपूर्ण माहिती देऊन चर्चा करण्यासाठी दिनांक १६ जानेवारी रोजी जनता विद्यालयात सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती.

सभेत डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनचे कोअर कमिटी मेंबर दामोधर डहाळे यांनी फाउंडेशनचे उद्दिष्ट, कार्य याविषयी तसेच स्पेस झोन इंडिया व मार्टीन ग्रुप याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापक केळवदे, शिक्षक. पंकज बोरकर, गभने, हिंगे, डोंगरे , पटले , साठवणे उपस्थित होते.