शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

जांभळी गावाला आले छावण ीचे रुप

By admin | Updated: November 4, 2014 22:35 IST

मागील १५ दिवसांपासून बिबट्याच्या दहशतीत जीवन जगत असलेल्या नागरिकांना आताही मोकळा श्वास घेता येत नाही. जराही शेतात किंवा घराबाहेर जायचे म्हटले की समोर दिसते ती बिबट्याची दहशत.

बिबट सापडेना : नागरिकांमध्ये भीती अन् संताप, २०० अधिकारी व कर्मचारी तैनातसंजय साठवणे - साकोलीमागील १५ दिवसांपासून बिबट्याच्या दहशतीत जीवन जगत असलेल्या नागरिकांना आताही मोकळा श्वास घेता येत नाही. जराही शेतात किंवा घराबाहेर जायचे म्हटले की समोर दिसते ती बिबट्याची दहशत. एक महिला बिबट्याच्या शिकारीला बळी पडली. त्यामुळे नागरिक धास्तावले आहे. सध्या या गावात वनअधिकारी, कर्मचारी, पोलीस, राज्य राखीव दल असे २०० च्यावर कुमक लागली असून साकोली तालुक्यातील जांभळी (खांबा) या गावाला छावणीचे रुप आले आहे. गावाची लोकसंख्या १२०० असून या गावात आताही एवढी दहशत आसहे की लोक शेतातही जायला घराबाहेर निघत नाही. जांभळी गाव हे नागझिरा व्याघ्रप्रकल्पाला लागले असून हे गाव वनविभाग साकोलीच्या हद्दीत येत असून गावाला लागलेले जंगल हे वन्यजीव विभाग नागझिरा व्याघ्रप्रकल्पाच्या अखत्यारीत येते. गावाच्या सभोवताल जंगल व्यापलेले आहे. त्यामुळे एकंदरीतच परिसरात वन्यप्राण्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात नेहमीच असते.गाव परिसरात वाघ, बिबट, अस्वल, हरिण यासह अन्य वन्यप्राणी नेहमीच दिसतात. हे या परिसरातील लोकांसाठी नवीन नाही. पण शेळ्यांची व माणसांची शिकार ही या परिसरातील पहिलीच घटना आहे.या बिबट्याचे पूर्वी पंधरा वीस दिवसांपासून शेळ्या फस्त करण्याचे प्रकार सुरु केले. याची माहिती गावातीलच लोकांनी वनविभागाला दिली. यावेळी जर वनविभागाने या बिबटाला पकडण्यासाठी जर उपाययोजना केली असती तर कदाचित त्या वृद्ध महिलेचा जीव वाचविता आला असता.वृद्ध महिलेच्या शिकारीपूर्वी साकोली वनविभागातर्फे प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना या बिबट्याला जेरबंदी करण्याची परवानगी मागितली होती. मात्र प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी ही मागणी फेटाळली. परिणामी वनविभागाने ही कारवाई टाळली व महिलेला जीव गमवावा लागला. त्यामुळे वनविभागालाच या प्रकरणात दोषी ठरवून त्यांचेवरही कार्यवाही करण्यात यावी अशी मागणीही आता जोर धरत आहे. मळाबाई बावणे या वृद्ध महिलेच्या मृत्यूनंतर वनविभाग जागा झाला. त्या दिवसापासून गावात बिबट पकडण्यासाठी पिंजरे मांडणे, वनकर्मचाऱ्यांची गस्त लावणे असे प्रकार सुरु झाले. सद्यस्थितीला या गाव परिसरात या बिबटला पकडण्यासाठी सहा पिंजरे लावण्यात आले.या गावात एक सहायक वनसंरक्षक, दोन वनक्षेत्राधिकारी, आठ सहाय्यक वनक्षेत्राधिकारी, तुमसर, नाकाडोंगरी, लाखनी, लाखांदूर, साकोली यासह इतर ठिकाणचे असे एकूण २०० वनरक्षक, ५० वनमजूर व वन्यजीव विभागाचे दहा कर्मचारी असे एकूण २०० कर्मचारी या ठिकाणी गस्तीवर आहेत. मात्र हा बिबट आताही मोकळाच असून गावात मात्र कमालीची दहशत आहे.