शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

फिरते पशुचिकित्सालयाची सुरुवात तुमसरातून होणार

By admin | Updated: April 22, 2017 00:46 IST

पशुपालन व्यवसायात वाढ होवून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. म्हणून महाराष्ट्र राज्यात फिरते

भंडारा : पशुपालन व्यवसायात वाढ होवून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. म्हणून महाराष्ट्र राज्यात फिरते पशुचिकित्सालयाची सुरुवात तातडीने सुरु करण्यासंबंधाने आ. चरण वाघमारे यांनी २०१७ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पशुसंवर्धन विभागाच्या पुरवणी मागणीच्या तासात विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व मत्सविकास मंत्री महादेव जानकर यांनी फिरत्या पशुचिकित्सालयाची सुरूवात तुमसरातून करण्याचे आश्वासन दिले आहे. आ.चरण वाघमारे यांच्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले की, शासनाने कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागासाठी अर्थसंकल्पात आवश्यक ती तरतुद केलेली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ व्हावी याकरिता शेतकरी पट, शेतकरी उद्योगासाठी अर्थसंकल्पात तरतूद केलेली आहे. पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून फिरते विक्री पशुचिकित्सालय योजना सुरु झाली असून त्या योजनेची प्रायोगिक तत्वावर राज्यातील तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राची निवड करण्यात आली असून या योजनेची सुरुवात आ.चरण वाघमारे यांच्या प्रयत्नाने तुमसर येथून होणार आहे, असे आश्वासन पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी विधानसभेत दिले. पशुसंवर्धन मंत्री यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी होणार असल्याने पशुपालकांचे अच्छे दिन येण्यास सुरुवात होईल, असे आशावाद आ. वाघमारे यांनी व्यक्त केले.(नगर प्रतिनिधी)