शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

कायद्याची साक्षरता वाढविणे गरजेचे

By admin | Updated: February 7, 2016 01:21 IST

अधिकार आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपल्या अधिकाराची मागणी करताना दुसऱ्याच्या अधिकारावर बाधा उत्पन्न होणार नाही याची दक्षता घ्यावयाची जबाबदारी...

विधी साक्षरता शिबिर : मंजुषा अलोणे यांचे प्रतिपादनवरठी : अधिकार आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपल्या अधिकाराची मागणी करताना दुसऱ्याच्या अधिकारावर बाधा उत्पन्न होणार नाही याची दक्षता घ्यावयाची जबाबदारी हे आपले कर्तव्य आहे. प्रत्येकांना हक्काची जाणीव करून देणे आणि कर्तव्याची अंमलबजावणी करण्याकरिता कायद्याची साक्षरता वाढवणे आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाने शालेय शिक्षणाप्रमाणे कायदेविषयक शिक्षण घेणे आजची गरज आहे, असे प्रतिपादन तिसरे सहदिवाणी न्यायधीश (कनिष्ठस्तर) मंजुषा अलोणे यांनी केले.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि ग्रामपंचायत कार्यालय वरठी यांच्या संयुक्त विद्यमाने विधी साक्षरता शिबिर घेण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थित विद्यार्थी आणि नागरिकांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. अध्यक्ष म्हणून न्यायाधीश मंजुषा अलोणे व प्रमुख वक्ते म्हणून अधिवक्ता विशाखा बांते, रेखा शहारे व अधिवक्ता फुले आणि प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच संजय मिरासे, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र बोरकर, संगीता सुखानी, सुनीता बोंदरे, पंचायत समिती सदस्य पुष्पा भुरे, जेष्ठ नागरिक संघटनेचे सचिव देवीदास डोंगरे उपस्थित होते.यावेळी तज्ज्ञ मार्गदर्शक अ‍ॅड. विशाखा बांते यांनी बालकांचे अधिकार व माहितीचा अधिकार २००५ व अ‍ॅड. रेखा शहारे यांनी जादुटोणाविरोधी कायदा आणि न्यायाधीश मंजुषा अलोणे यांनी मार्गदर्शन केले. सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत ग्राम पंचायतच्या वतीने सरपंच संजय मिरासे यांनी केले.संचालन व प्रास्ताविक प्रा. अश्ववीर गजभिये व आभार प्राचार्य तथागत मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक संघटनेचे उपाध्यक्ष हरी भाजीपाले, रमेश रामटेके, माहिती अधिकार कार्यकर्ता शरदचंद्र वासनिक, राधाकृष्ण डहाके, रूपलता फुले, कैलास बन्सोड, ग्राम पंचायत कर्मचारी जितेंद्र हरडे, अरविंद वासनिक, कैलास नारनवरे, संदीप वासनिक, नवप्रभात कन्या हायस्कूल व नवप्रभात हायस्कूलचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते. विधी शिबिराला वरठीवासीयांनी लाभ घेतला. (वार्ताहर)