शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

आंतरजातीय दाम्पत्यांना शिधापत्रिका मिळणार

By admin | Updated: November 15, 2014 22:41 IST

आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देऊन शासनस्तरावर अनेक सवलती उपलब्ध असल्या तरी स्वस्त धान्य दुकानातील शिधापत्रिकेबाबत असे जोडपे जिल्हा प्रशासनाच्या लेखी उपेक्षित होते.

भंडारा : आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देऊन शासनस्तरावर अनेक सवलती उपलब्ध असल्या तरी स्वस्त धान्य दुकानातील शिधापत्रिकेबाबत असे जोडपे जिल्हा प्रशासनाच्या लेखी उपेक्षित होते. नवीन शिधापत्रिकेसाठी आणि शिधापत्रिकेत नाव सामावून घेण्यासाठी या जोडप्यांची फरफट सुरू होती. आता ही फरफट पूर्णत: थांबली असून आंतरजातीय विवाहितांच्या शिधापत्रिकेचा मार्ग मोकळा झाला आहे. या आशयाचे लेखी निर्देश जिल्हा प्रशासनाने तहसील कार्यालयाला दिले आहेत. आंतरजातीय विवाहित जोडप्यांचे नाव शिधापत्रिकेत समाविष्ट करण्यासाठी तहसील कार्यालयाच्या अन्न पुरवठा विभागात अर्ज पडून होते. कारण काय तर विवाहितेचे नाव सासरच्या रेशनकार्डमध्ये समाविष्ठ करावयाचे असल्यास विवाहितेच्या माहेरचे मुळ कार्ड तात्पुरते देणे आवश्यक होते. हीच कायदेशिर अडचण समोर करून प्रशासनाने हात झटकले. आंतरजातीय विवाहाला शासनस्तरावर कायदेशिर मान्यता असताना याबाबतीत शासनाकडून अन्याय होत आला. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी साकोली येथील रवी भोंगाने यांनी राज्यातील आंतरजातीय विवाहित जोडप्यांची माहिती जमा केली. त्यानंतर स्वत: ३१ जुलै २०१२ रोजी भंडारा जिल्हाधिकारी यांच्या जनता दरबारात न्याय मागितला. तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी जनता दरबारात हा प्रश्न गांभीर्याने हाताळला. यावेळी बाजू मांडताना याचिकाकर्ते भोंगाने यांनी आई-वडिलांच्या मनाविरूद्ध विवाह केलेल्या दाम्पत्यांना कुटुंबाकडून मुळ रेशनकार्ड मिळत नाही. परंतु विवाहितेचे नाव तिच्या सासरच्या रेशनकार्डामध्ये समाविष्ट करून घेणे हा तिचा न्याय हक्क आहे. शासकीय कामांसाठी रेशनकार्डचा पुरावा ग्राह्य धरला जात असल्यामुळे रेशनकार्ड तयार करून देणे ही कायदेशीर बाब ठरते. त्यामुळे विवाहितेच्या आई-वडिलांच्या मुळ कार्डसाठी अडवून ठेवणे हे कायदेशीर चुकीचे आहे, असे पटवून दिले.दोन वर्षानंतर हा प्रश्न निकाली निघाला असून जिल्हाधिकारी कार्यालयाने लेखी निर्देश जारी केले आहे. यात पती-पत्नी हे एकाच तालुक्याचे असल्यास आणि मुळ रेशनकार्डसाठी वारंवार आदेशात्मक सूचना देऊनही जमा न झाल्यास गावातील वडिलांच्या कार्डातून किंवा कार्यालयाच्या दुकानदाराच्या डी-१ रजिस्टरवरून संबंधित मुलीचे नाव, युनिट कमी करून संबंधित अर्जदारासोबत लग्न झाल्याचा पुरावा घेऊन त्याच कार्डात नाव नोंदविता येईल, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)