शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान मोजणीची मर्यादा वाढवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील पालांदूर परिसरातील चुलबंद खोऱ्यातील शेतकरी प्रगतिशील शेती करतात. यात कृषी विभागाचे मार्गदर्शन मिळत आहे. साधारण धानाला वगळून संकरित धानाची शेती ६० टक्क्यांवर पोहोचलेली आहे. प्रतिएकर शेतकऱ्यांना किमान ३० क्विंटलपर्यंतचे उत्पन्न हाती आले आहे. नव्या तंत्राचा ध्यास घेत शेतकरी धान पिकाचे उत्पादन घेत आहेत. नवनव्या धान्याच्या प्रजाती भरघोस उत्पन्नाकरिता पालांदूर परिसरातील शेतकरी ख्यातनाम आहेत.

मुखरू बागडेलोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : बहुप्रतिक्षित धान खरेदी केंद्रे पालांदूर परिसरात सुरू झाली आहेत. यात प्रतिएकर १२. ४० क्विंटल मोजणीची धान मर्यादा ठेवण्यात आली आहे. गतवर्षी १४.४० क्विंटल एवढी होती. दोन क्विंटलची घट झाल्याने चुलबंद खोऱ्यातील सिंचित शेतकरी संकटात सापडले आहेत. किमान गतवर्षी एवढी तरी मोजणीची मर्यादा अत्यावश्यक असल्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. जिल्ह्यातील पालांदूर परिसरातील चुलबंद खोऱ्यातील शेतकरी प्रगतिशील शेती करतात. यात कृषी विभागाचे मार्गदर्शन मिळत आहे. साधारण धानाला वगळून संकरित धानाची शेती ६० टक्क्यांवर पोहोचलेली आहे. प्रतिएकर शेतकऱ्यांना किमान ३० क्विंटलपर्यंतचे उत्पन्न हाती आले आहे. नव्या तंत्राचा ध्यास घेत शेतकरी धान पिकाचे उत्पादन घेत आहेत. नवनव्या धान्याच्या प्रजाती भरघोस उत्पन्नाकरिता पालांदूर परिसरातील शेतकरी ख्यातनाम आहेत. खासगीतील बीजोत्पादनातील धान कंपन्या पालांदूर परिसरात येत आहेत. चुलबंद खोरा असल्याने सुपीक जमीन हा सुमार उत्पादनाचा मुख्य आधार आहे. कृषी विभागाच्या प्रयत्नांनी व शेतकऱ्यांच्या मेहनतीने प्रतिएकरी २५ ते ३० हजार रुपयांचा खर्च प्रगतिशील शेतकरी करतो आहे. शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार एका एकराला लागणाऱ्या खर्चाचे सुद्धा धान खरेदी केंद्रावर खरेदी केले जात नाही. याचा विचार शासनाने करणे अत्यंत आवश्यक आहे. उत्पन्नातून हाती आलेल्या आकडेवारीचा अभ्यास घेत किमान १५ क्विंटल प्रति एकराची मर्यादा निर्धारित करणे काळाची गरज आहे. आधारभूत केंद्रावर सातबाराची क्षमता तपासूनच खरेदी सुरू आहे. क्षमतेपेक्षा जास्त झालेले धान शेतकऱ्याला परत केली जात आहेत. उर्वरित धानाचे करायचे काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे. लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांना सहकार्य करण्याची गरज आहे.

पालांदूर येथे सेवा सहकारी संस्थेंतर्गत धान खरेदी सुरू झालेली आहे. जिल्हा पणन कार्यालयाच्या आदेशाने प्रती एकर १२.४० क्विंटलची मर्यादा आहे. कालपर्यंत सुमारे ११५० क्विंटलची धान खरेदी आटोपली आहे. धान खरेदीची प्रती एकर मर्यादा अत्यल्प असल्याची ओरड शेतकरी करीत आहेत; मात्र आमचे नियमाने हात बांधलेले आहेत. नियमानुसारच धान खरेदी सुरू आहे.-प्रेमराज खंडाईत, ग्रेडर, पालांदूर.

माझी संपूर्ण शेती सिंचित आहे. यात अर्ध्याच्यावर संकरित धानाची लागवड केली होती. एकरी उत्पन्न २० क्विंटलच्या पुढे झाले आहे. तेव्हा जिल्हा पणन कार्यालयाने वास्तव परिस्थितीचा अभ्यास घेत आम्हा शेतकऱ्यांवर धान खरेदीची वजन मर्यादा वाढवून बळीराजाला सहकार्य करावे अशी मागणी आहे. -वीरेंद्र मदनकर, प्रगतिशील शेतकरी मऱ्हेगाव

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती