शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच सदस्यांच्या मानधनात वाढ

By admin | Updated: September 27, 2014 23:10 IST

शासनाने सरपंचाच्या मानधनात दुपटीने वाढ केल्याने सरपंचांना दिवाळीपूर्वीच भेट दिली आहे. गत आठवड्यात या संदर्भातील अध्यादेश पारित करून निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश ग्रामपंचायतींना

रवीन्द्र चन्नेकर- बारव्हाशासनाने सरपंचाच्या मानधनात दुपटीने वाढ केल्याने सरपंचांना दिवाळीपूर्वीच भेट दिली आहे. गत आठवड्यात या संदर्भातील अध्यादेश पारित करून निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत. सरपंचाना लोकसंख्येनिहाय देण्यात येणाऱ्या मानधनात राज्य शासन ७५ टक्के तर ग्रामपंचायतीतून २५ टक्के अनुदान दिले जाणार आहे.सरपंचाच्या मानधनाबरोबरच सदस्यांच्या बैठक भत्त्यातही तब्बल आठ महिने वाढ करण्यात आली आहे. २५ रूपयांवरून हा भत्ता २०० रूपयांवर पोहोचला आहे. एरवी मासिक बैठकीकडे पाठ फिरवणाऱ्या सदस्यांची वाढत्या भत्त्यांमुळे बैठकांना उपस्थिती वाढणार आहे. यापूर्वी दोन हजारापर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंंचांना ८०० रूपये मानधन दिले जात होते. नव्याने हे मानधन अनुक्रमे एक हजार, एक हजार ५०० रूपये, दोन हजार रूपये करण्यात आले आहे.सदस्यांचा बैठक भत्ता १० रूपयांवरून २५ रूपये करण्यात आला आहे. हा भत्ता १२ बैठकीपुरताच मर्यादित राहणार आहे. मर्यादीपेक्षा जास्त बैठकीसाठी भत्ता दिला जाणार नाही. यात संबंधित सरपंच व ग्रामसेवक यांनी ही खबरदारी घेणे आवश्यक आहे.ग्रामपंचायत सदस्यांना बैठक भत्ता देण्याकरिता, ग्रामपंचायतीला येणाऱ्या खर्चाकरिता शासन १०० टक्के अनुदान देणार आहे. यात लोकसंख्येनुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात वाढ करण्यात आली आहे. त्यांना दरमहा दिली जाणारी किमान वेतन अदा केल्यानंतर सरपंच मानधन आणि सदस्य बैठक भत्ता अनुज्ञेय राहील. सरपंच आणि ग्रामसेवक यांची संयुक्त जबाबदारी राहील. यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीत सरपंच मानधन आणि सदस्य बैठक भत्तेच्या पूर्वी कामगारांचे वेतन द्यावे लागणार आहे. सरपंचाचे मानधन व सदस्यांच्या भत्त्यात वाढ झाली असल्याने मासिक बैठकीत उपस्थिती पूर्णपणे राहील. यात विकासाचे निर्णय घेणे शक्य होईल. मानधन हे लोकसंख्येनुसार देण्यात येणार असून काही नियमसुद्धा देण्यात आले आहे हे विशेष.