शहरं
Join us  
Trending Stories
1
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
2
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
3
Top Marathi News Live: 'नीट' पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ABVPचे दिल्लीच्या NTE कार्यालयाबाहेर आंदोलन
4
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
5
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
6
Tata Trusts Row: ३६ वर्षांपूर्वीच्या शेअर ट्रान्सफरवरुन नवा वाद; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांना नोटीस
7
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
8
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा; एआयएडीएमकेमध्ये फूट
9
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
10
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
11
Mumbai: डोक्यावर हात ठेवून आजार बरे करणाऱ्या चौघांना बेड्या; घरात देवाच्या मूर्ती, प्रतिमा पूजेला विरोध केल्याचा आरोप
12
Art Of Living: तुम्हाला माहीत आहे का? श्री श्री रवीशंकर त्यांच्या नावात दोनदा 'श्री' का लावतात?
13
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल 'भाजपा'मधून लढणार; रोहित पवारांचा मोठा दावा
14
इराणची नाकेबंदी युक्रेन तोडणार! अमेरिकेच्या हाती लागलं 'ब्रह्मास्त्र'; होर्मुजमध्ये आता रक्ताचा खेळ?
15
'मला पर्याय शोधून दाखवाच!', भरमिटिंगमध्ये अपमान केल्याने तरुणीचा तडकाफडकी राजीनामा; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
16
सायको किलर! २५ तासांत ३ हत्या करणाऱ्या गुरप्रीतच्या बॅगेत होतं ७ मृत्यूंचं गुपित
17
‘सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद’च्या अफवा खोट्या; एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण, पण...
18
Shocking: खळबळजनक! लिंबू तोडल्याच्या रागातून १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; १२ जणांना अटक
19
एलिफंटा ते नाणेघाट : प्राचीन व्यापाराचा ‘कॉरिडॉर’ उजेडात; पुरातत्व विभागाचे उत्खनन, व्यापारावर शिक्कामोर्तब
20
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगा पुलावर जीवघेण्या खड्ड्यांमुळे अपघातात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:01 IST

गत आठवड्याभरापासून पावसाला सुरुवात झाली असल्याने खड्ड्यात पाणी साचून आहे. त्यामुळे दुचाकीधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. रविवारी दुपारी वैनगंगा पुलावरून जात असताना एका दुचाकीचालकाचा गंभीर अपघात झाला. खरीप हंगामाचे दिवस असल्याने या मार्गावरून जाणाºया वाहनांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देनिलज-पवनी राज्यमार्गावरील प्रकार : बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : निलज-पवनी-कारधा राज्यमार्गावर वैनगंगेच्या पुलावर जीवघेणे खड्डे पडले असून नेहमीच होणाऱ्या अपघातात वाढ झाली आहे. मात्र तरीदेखील बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. आठवडाभरातून किमान दोन-तीन अपघाताच्या घटना घडत असतानाही या खड्ड्यांच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे डोळेझाक होत आहे.
गत आठवड्याभरापासून पावसाला सुरुवात झाली असल्याने खड्ड्यात पाणी साचून आहे. त्यामुळे दुचाकीधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. रविवारी दुपारी वैनगंगा पुलावरून जात असताना एका दुचाकीचालकाचा गंभीर अपघात झाला. खरीप हंगामाचे दिवस असल्याने या मार्गावरून जाणाºया वाहनांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्ता दुरुस्तीसाठी परिसरातील लोकप्रतिनिधींना अनेकदा सांगण्यात आले आहे. याच मार्गावरून अनेकदा जिल्हा परिषद सदस्य, तालुका दंडाधिकारी, पोलीस उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक, गटविकास अधिकारी, वनपरिक्षेत्राधिकारी यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांची ये-जा असते. मात्र तरीदेखील याकडे कुणीही लक्ष देत नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. मार्गावर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे आहेत. तर काही ठिकाणी रस्ता अरुंद बनल्याने अपघातात वाढ झाली आहे. नेहमीच होणाºया अपघाताची पोलीस ठाण्यात नोंद होत नाही. निलज-पवनी-कारधा महामार्गाचे बांधकाम अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे बांधकामाची गती संथ असल्याने किमान खड्डे बुजविण्याचे काम करीत त्वरीत करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. नेहमीच होणाºया अपघातामुळे आणखी किती बळी प्रशासन घेणार आहे असा संतप्त सवाल वाहनधारक करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात