पिक विमा योजनेत ऊस, हळद पिकाचा समावेश करा

By Admin | Updated: September 3, 2016 00:26 IST2016-09-03T00:26:38+5:302016-09-03T00:26:38+5:30

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत विविध पिकांचा समावेश असला तरी यात ऊस व हळदीचा समावेश नाही.

Include sugarcane, turmeric crop in crop insurance scheme | पिक विमा योजनेत ऊस, हळद पिकाचा समावेश करा

पिक विमा योजनेत ऊस, हळद पिकाचा समावेश करा

भोंडेकर यांची मागणी : पालकमंत्र्यांना निवेदन
भंडारा : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत विविध पिकांचा समावेश असला तरी यात ऊस व हळदीचा समावेश नाही. त्यामुळे या योजनेत हळद व ऊस पिकाचा समावेश करण्यात यावा अशी मागणी शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पालकमंत्री डॉ.दीपक सावंत यांना निवेदनातून केली आहे.
भंडारा जिल्ह्यात धान हे प्रमुख पिक आहे. ऊस आणि हळद हे नगदी पिक असून या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. पिक विमा योजनेत या पिकांचा समावेश नसल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाना सामोरे जावे लागत आहे.
भंडारा जिल्ह्यात १.९२ लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. १.६५ लाख हेक्टर क्षेत्रात भात पिकांची लागवड करण्यात येते. ५ हजार हेक्टर मध्ये सोयाबीन, ७ हजार हेक्टर मध्ये ऊस, ४०० हेक्टरमध्ये हळद लागवड करण्यात येते. भंडारा जिल्ह्यात या पिकाचे लागवड क्षेत्र अधिक असून या पिकांना पिक विमा योजनेत सामावून घेण्याची मागणी नरेंद्र भोंडेकर यांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Include sugarcane, turmeric crop in crop insurance scheme