गावागावांत होणार गोळ्यांचे वाटप : जनजागृतीसाठी आरोग्य विभागाचा पुढाकारभंडारा : राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत एक दिवसीय औषधोपचार मोहीम कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य उत्तम कळपाते यांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम सोमवारी प्राथमिक आरोग्य केंद्र खमारी येथे घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर हे होते. अतिथी म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डोईफोडे तसेच पंचायत समिती सदस्य सुजाता फेंडर, नितू सेलोकर, सरंपच सेवकराम बोरकर, सरपंच टेकाम उपस्थित होते. प्रास्ताविकातून डोईफोडे यांनी १४ ते १८ डिसेंबर या कालावधीत सर्व जनतेला हत्तीरोग प्रतिबंधक डीईसी गोळ्या वयोमानानुसार घेण्याचे आवाहन केले. उपरोक्त गोळ्यांचे वाटप आरोग्य कर्मचा-यांमार्फत संपूर्ण जिल्हयात करण्यात येत आहे. गरोदर माता, दोन वर्षाखालील बालके व गंभीर आजारी रुग्णांनी या गोळयाचे सेवन करु नये जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर यांनी सांगितले. संचालन वैद्यकिय अधिकारी डॉ. जुगनाके (खमारी) यांनी केले. आभार जिल्हा हिवताप अधिकारी आभार डॉ. आर.डी. झलके यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी, जिल्हा हिवताप विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.जमनापुर येथे हत्तीरोग मोहिमेचे उद्घाटनजमनापूर येथे गोळयांचे वाटपसाकोली : प्राथमिक आरोग्य केंद्र खांबा उपकेंद्र पिंडकेपार अंतर्गत जमनापुर येथे जिल्हा परिषद सदस्या मंदा गणवीर पंचायत समिती सदस्य छाया पटले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जे. डब्ल्यू. सुखदेवे यांच्या उपस्थितीत हत्तीरोग मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी डॉ. सुखदेवे म्हणाले, एम. डी. ए. औषधोपचारांतर्गत स्वयंसेवक घरी आल्यानंतर वयोमानानुसार दिलेल्या गोळ्या समक्ष सेवक करण्यात लहान स्वरुपातील दुष्परिणाम जसे ताप येणे, मळमळ वाटणे, उल्टी येणे, डोके दुखणे यासारखे आढळून आल्यास याची माहिती त्वरित स्वयंसेवकांना दयावी व रात्रीच्या वेळी रक्त तपासून घ्यावे. या मोहिमेतून दोन वर्षाखालील बालके, गरोदर माता आणि अतीगंभीर आजार असलेले रुग्ण यांना काढण्यात आले आहे. स्वयंसेवक घरी आल्यास त्रूांना सहकार्य करा असे आवाहन डॉ. सुखदेवे यांनी केले.यावेळी बी. एस. चिंधालोरे, मोहन बावणकर, पी.एन. डोंगरे, के. एस. मस्के, लक्ष्मी जैस्वाल यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी/तालुका प्रतिनिधी)
खमारी येथून हत्तीरोग नियंत्रण मोहिमेचे उद्घाटन
By admin | Updated: December 15, 2015 00:51 IST