आय एम सॉरी मम्मी...मेसेज पाठवत तरुणीनं केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 08:16 IST2023-02-07T08:13:43+5:302023-02-07T08:16:27+5:30

तनिष्का उर्फ निधी जितेंद्र पाटील (१८, रा. हसारा टोली) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती तुमसर येथील मातोश्री विद्या मंदिरात बारावी विज्ञान शाखेत शिकत होती.

I'm sorry mom girl committed suicide while sending messages | आय एम सॉरी मम्मी...मेसेज पाठवत तरुणीनं केली आत्महत्या

आय एम सॉरी मम्मी...मेसेज पाठवत तरुणीनं केली आत्महत्या

तुमसर (भंडारा)  : आय एम सॉरी मम्मी... असा मेसेज आईला पाठवत बारावीच्या विद्यार्थिनीने आजीच्या घरी छताच्या पंख्याला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना तुमसर तालुक्यातील हसारा येथे सोमवारी सकाळी उघडकीस आली. वडिलांच्या निधनानंतर ती आपल्या आजीकडे शिक्षणासाठी राहत होती.

तनिष्का उर्फ निधी जितेंद्र पाटील (१८, रा. हसारा टोली) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती तुमसर येथील मातोश्री विद्या मंदिरात बारावी विज्ञान शाखेत शिकत होती. मूळ नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील तनिष्काच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यामुळे ती  हसारा येथे आपल्या आजीकडे शिक्षणासाठी राहत होती. बारावीचे प्रात्यक्षिक पेपर सुरू आहेत.  

रविवारी रात्री आपल्या मोबाइलवरून कामठी येथे राहत असलेल्या आईला ‘आय एम सॉरी...लव्ह यू मम्मी...’ असा मेसेज पाठवून मध्यरात्रीच्या सुमारास पंख्याला ओढणीने गळफास लावून घेतला. सकाळी ७ वाजता तनिष्का आतापर्यंत  उठली का नाही, म्हणून मावशी व आजीने खोलीत खिडकीतून डोकावून बघितले. तेव्हा ती गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. 

Web Title: I'm sorry mom girl committed suicide while sending messages