शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदीत चुलबंद नदीपात्रातून अवैध रेती उत्खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 05:00 IST

तालुक्यातील रेतीघाटाचे लिलाव झालेले नाहीत. बांधकाम करणाऱ्यांना छुप्या मार्गाने, वाढीव दरात रेतीचा पुरवठा केला जात आहे. तालुक्यात रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतूक करणारे रेतीमाफिया शासनाचे उत्पन्न बुडवत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील नरव्हा व मºहेगाव येथून लॉकडाऊनच्या काळात अवैध रेती तस्करी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. रेतीतस्करांनी थेट नदीपात्रात ट्रॅक्टर उतरविण्यासाठी रस्ते तयार केले आहेत.

ठळक मुद्देरेती तस्करी जोमात सुरु : पोलीस व महसूल अधिकारी, कर्मचारी कोरोना बंदोबस्तात व्यस्त

चंदन मोटघरे।लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : तालुक्यातील मºहेगाव, नरव्हा या चुलबंद नदीपात्रातून रेतीचे अवैध उत्खनन राजरोसपणे सुरु असून लॉकडाऊनच्या काळात प्रशासन व्यस्त असल्याचे फायदा घेत अवैख वाहतूक स्थानिक तलाठी, मंडळ अधिकारी व पोलीस प्रशासनासमोर होत असल्याचे चित्र दिसून येत आहेत.तालुक्यातील रेतीघाटाचे लिलाव झालेले नाहीत. बांधकाम करणाऱ्यांना छुप्या मार्गाने, वाढीव दरात रेतीचा पुरवठा केला जात आहे. तालुक्यात रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतूक करणारे रेतीमाफिया शासनाचे उत्पन्न बुडवत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील नरव्हा व मºहेगाव येथून लॉकडाऊनच्या काळात अवैध रेती तस्करी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. रेतीतस्करांनी थेट नदीपात्रात ट्रॅक्टर उतरविण्यासाठी रस्ते तयार केले आहेत.रेतीमाफिया अवैध रेतीचा साठा करून दामदुप्पट भावात विकत असतात. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जिल्हाभर खासगी, शासकीय कार्यालये बंदचा आदेश दिला आहे. जिल्हा न्यायालयाचे कामकाज मर्यादीत वेळेत आटोपले जातात. गर्दी टाळण्यासाठी शक्य तेवढ्या उपाययोजना प्रशासनाकडून केल्या जात आहेत. सर्वसामान्य नागरिकांनाही घराबाहेर पडू दिल्या जात नाही. हीच संधी रेतीमाफियांनी हेरली आहे. सर्व प्रमुख मार्गावरून मनमर्जीने अवैध रेतीचे परिवहन सुरु आहे. अनेक शासकीय कर्मचारी बघ्याच्या भूमिकेत आहेत. तालुक्यातील मिरेगाव, भूगाव, पळसगाव, नरव्हा, पाथरी, मºहेगाव, वाकल येथून अवैधपणे रेतीचीउचल केली जात आहे. अवैध उत्खनन व वाहतुकीला तहसीलदारांनी आळा घालणे आवश्यक आहे.ट्रक, ट्रॅक्टरद्वारे वाहतूकचुलबंद नदीतून शेकडो ब्रास रेतीचे अवैध उत्खनन व चोरी सर्रासपणे सुरु आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी विना क्रमांकाच्या ट्रॅक्टर व ट्रॉलीने लाखनी, पालांदूर (चौ.), मुरमाडी (तुपकर) व परिसरातील खासगी व शासकीय बांधकामांना सर्रासपणे रेती पुरविली जात असते. ही अवैध वाहने पोलीस स्टेशनसमोरून जात असतात. चुलबंदचे नदीघाट रेतीमाफियांसाठी तस्करीचे कुरण बनले आहे. परिसरात रेतीमाफियांची मोठी टोळी असून ते प्रशासन व्यस्त असल्याचा फायदा घेत आहेत. मºहेगाव घाटावर रात्रभर विनाक्रमांकाच्या ट्रॉलीसह, ट्रॅक्टरची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते.

टॅग्स :sandवाळू