अर्धवट रस्ता बांधकामाकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 06:00 AM2020-02-21T06:00:00+5:302020-02-21T06:00:40+5:30

येथील दुर्गा चौक ते राष्ट्रीय महामार्गापर्यंत डांबरीकरणाचा रस्ता पूर्णपणे उखडून टाकण्यात आला. त्याठिकाणी नवीन सिमेंट रस्ता तयार करण्यासाठी मॉस क्राँक्रीट करण्यात आली. मात्र अर्धा रस्ता तसाच खोदलेला आहे. या रस्त्यावरून जाता येताना अनेकजण पडले असून त्यांना दुखापत झाली आहे. मात्र नगरपरिषदेचे याकडे दुर्लक्ष आहे.

Ignoring partial road construction | अर्धवट रस्ता बांधकामाकडे दुर्लक्ष

अर्धवट रस्ता बांधकामाकडे दुर्लक्ष

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : येथे सध्या राजकीय वातावरण तापले असले तरी नगरपरिषदेचे मात्र नागरिकांच्या समस्याकडे दुर्लक्ष आहे. अपूर्ण रस्त्यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. एवढेच नाही तर या अपूर्ण रस्त्यावरून जाता-येताना अनकजण पडले आहेत. नगरपरिषदेचे याकडे दुर्लक्ष आहे.
येथील दुर्गा चौक ते राष्ट्रीय महामार्गापर्यंत डांबरीकरणाचा रस्ता पूर्णपणे उखडून टाकण्यात आला. त्याठिकाणी नवीन सिमेंट रस्ता तयार करण्यासाठी मॉस क्राँक्रीट करण्यात आली. मात्र अर्धा रस्ता तसाच खोदलेला आहे. या रस्त्यावरून जाता येताना अनेकजण पडले असून त्यांना दुखापत झाली आहे. मात्र नगरपरिषदेचे याकडे दुर्लक्ष आहे. गत काही दिवसापासून रेतीघाट बंद झाल्याने सध्या रेतीचा तुटवडा आहे. रेती तुटवड्याचे कारण सांगत कंत्राटदार वेळ मारून नेत असला तरी ज्यावेळी कंत्राटदाराने या रस्त्याचे काम सुरू केले. त्यावेळी रेतीचा स्टॉक करून ठेवायला पािहजे होता. तसे न करता कंत्राटदाराने रस्ता खोदकाम करून रस्त्यावर गिट्टी टाकून ठेवली आहे. याला जवळपास वीस ते बावीस दिवसांचा कालावधी झाला आहे. नगरपरिषदेच्या या बेजबाबदारीमुळे नागरिक त्रासले असून अडचणीचा सामना करीत आहेत. हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावा व संबंधित कंत्राटदार योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Web Title: Ignoring partial road construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.