Honor Killing : मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने जावयाची हत्या, सासूने दिली सुपारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 13:04 IST2026-01-28T13:03:27+5:302026-01-28T13:04:22+5:30

Bhandara : ऑनर किलिंगच्या एका प्रकरणात सासूनेच सुपारी देऊन जावयाचा खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी प्रजासत्ताक दिनी भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील बेटाळा या गावात उघडकीस आली.

Honor Killing: Son-in-law killed after daughter ran away and got married, mother-in-law gave her a betel nut | Honor Killing : मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने जावयाची हत्या, सासूने दिली सुपारी

Honor Killing: Son-in-law killed after daughter ran away and got married, mother-in-law gave her a betel nut

लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी (भंडारा) :
ऑनर किलिंगच्या एका प्रकरणात सासूनेच सुपारी देऊन जावयाचा खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी प्रजासत्ताक दिनी भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील बेटाळा या गावात उघडकीस आली. आकाश शालिक शेंडे (३०, रा. बेटाळा) असे मृताचे नाव आहे. विशेष म्हणजे २० दिवसांपूर्वीच युवकाने प्रेमविवाह केला होता. पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे.

मृत आकाशची सासू अंजू कुंभलकर (४२), भारत बाळकृष्ण मोहतुरे (२५), महेंद्र बकाराम बोरकर (३१), दिनेश उर्फ सचिन मोहन ईश्वरकर (३७) आणि चेतन रमेश कुंभलकर (२२, सर्व रा. बेटाळा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

दि. २५ जानेवारीच्या सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास आकाश शेंडे हा घराबाहेर पडला. तो परत आलाच नाही. रात्री घरी परत न आल्याने गावात त्याची शोधाशोध करण्यात आली. मात्र तो कुठेच दिसला नाही. सकाळी पुन्हा त्याचा शोध घेतला असता बेटाळा-कुरोडा रस्त्याजवळील नाल्याच्या काठावर त्याचा मृतदेह आढळला. त्याला मारहाण करून नंतर त्याच्या गळ्यातील दुपट्टयाने गळा आवळून त्याची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. आकाशने २० दिवसांपूर्वी गावातीलच एका मुलीशी आंतरजातीय विवाह केला होता. आकाशला दारूचे व्यसन होते. मात्र, लग्नानंतर त्याने दारू पिणे सोडले होते. मोहाडी पोलिस आंतरजातीय विवाह आणि दारूचे व्यसन या दोन्ही बाजूने तपास करीत असताना आंतरजातीय विवाहाचा मुद्दा उजेडात आला. यानंतर आकाशच्या सासूनेच हे हत्याकांड घडवून आणल्याचे समोर आले. यात तिला तिच्या मुलाने (आकाशचा मेहुणा) साथ दिली. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

मंदिरात केले होते लग्न

आकाशने गावातील मुलीसोबत पळून जात ६ जानेवारी रोजी मोहाडी येथील राम मंदिरात लग्न केले होते. आकाश हा कुणबी समाजाचा असून, मुलीचे कुटुंब तेली समाजातील आहे. आकाश हा मजुरी तसेच ट्रॅक्टर चालवण्याचा काम करायचा. मृत आकाशच्या मागे आई-वडील व मोठी विवाहित बहीण असा आप्त परिवार आहे.

प्रेमप्रकरणातून खुनाच्या दोन घटना

दोन दिवसांपूर्वीच तुमसर तालुक्यातील मेहगाव येथे प्रेमप्रकरणातून मोनू उर्फ कपिल राणे या तरुणाची हत्या झाली होती. या दोन्ही तरुणांच्या हत्येमुळे तुमसर व मोहाडी तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Web Title : ऑनर किलिंग: अंतरजातीय विवाह पर सास ने दामाद की हत्या करवाई

Web Summary : भंडारा में एक सास ने अंतरजातीय विवाह के कारण अपने दामाद की हत्या की साजिश रची। आकाश शेंडे नामक पीड़ित ने हाल ही में शादी की थी। पुलिस ने सास और उसके बेटे सहित पांच लोगों को गिरफ्तार किया, जिन्होंने अपराध कबूल कर लिया।

Web Title : Honor Killing: Mother-in-law Murders Son-in-law Over Intercaste Marriage

Web Summary : In Bhandara, a mother-in-law orchestrated her son-in-law's murder because he married her daughter from a different caste. The victim, Akash Shende, had recently married. Police arrested five individuals, including the mother-in-law and her son, who confessed to the crime.