शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

घरकुल बांधकाम साहित्य मिळणार एका छताखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:39 IST

राहुल भुतांगे तुमसर : घरकुल बांधकाम साहित्य गोळा करताना लाभार्थ्यांना मोठी दमछाक होते. घर पूर्ण करताना अनंत अडचणींचा सामना ...

राहुल भुतांगे

तुमसर : घरकुल बांधकाम साहित्य गोळा करताना लाभार्थ्यांना मोठी दमछाक होते. घर पूर्ण करताना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु आता घरकुल बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. घरकुल मार्ट अभियानांतर्गत तालुक्यातील मच्छेरा येथे पहिला प्रयोग करण्यात आला आहे.

तालुक्यातील मच्छेरा येथील आस्था महिला बचत गटातर्फे अभियानांतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. या ग्रामीण घरकुल मार्टचे उद्घाटन गटविकास अधिकारी धीरज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या घरकुल मार्टमध्ये लाभार्थ्यांना बांधकामासाठी सिमेंट, लोखंडी सळाकी, विटा, दरवाजे, खिळे, तार, शौचालय सीट, खिडकी आदी साहित्य एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. तुमसर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना १५ ते २० किलोमीटर अंतरावरुन साहित्य विकत आणावे लागत होते. मात्र आता या घरकुल मार्टमुळे लाभार्थ्यांना वाहतुकीचा खर्च वाचणार असून वेळेची बचत होणार आहे. या घरकुल मार्टचा फायदा सिहोरा परिसरातील १५ ते २० गावांना होणार आहे. या परिसरात २०० ते ३०० लाभार्थी असून त्यांना या मार्टमध्ये माफक दराने गुणवत्तापुर्ण साहित्य उपलब्ध होणार आहे.

२०२२ पर्यंत सर्वांसाठी घर हे शासनाचे महत्वाकांक्षी धोरण आहे. राज्य शासनाने देखील या धोरणाचा स्वीकार केला आहे. शबरी आवास, रमाई आवास आदी घरकुल योजना राबविल्या जात आहेत. या अभियानाच्या यशस्वितेसाठी तालुका अभियान व्यवस्थापक पुरुषोत्तम बिसेन, तालुका व्यवस्थापक सुरेंद्र ठाकरे, प्रभाग समन्वयक खुशबू पालेवार, ग्रामसंघ अध्यक्ष रिता वासनिक, सचिव सविता शिवरकर, उमेद समुदाय संसाधन व्यक्ती आणि सदस्य यासाठी प्रयत्न करीत आहेत. मच्छेरा येथे सुरु झालेला हा अभिनव प्रयोग संपूर्ण जिल्ह्यासाठी दिशादर्शक ठरणार असून एकाच छताखाली साहित्य मिळणार असल्याने लाभार्थ्यांना दिलासा मिळेल.