शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी हवालदिल

By admin | Updated: June 12, 2017 00:33 IST

कर्जाची उचल बँकांतून करताना दुय्यम निबंधकासमक्ष मुद्रांकावर शेती गहाण ठेवल्यावरही तलाठ्याकडे बोजा चढविणे,

कर्जप्रकरण: एक ते सव्वा महिन्याचा अवधी लागतोलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : कर्जाची उचल बँकांतून करताना दुय्यम निबंधकासमक्ष मुद्रांकावर शेती गहाण ठेवल्यावरही तलाठ्याकडे बोजा चढविणे, सातबारावर त्याची नोंद करणे तथा त्यानंतर बँकेच्या विविध अटींचा सोपस्कार शेतकऱ्यांना पूर्ण करावा लागतो. खरीपाचा हंगाम तोंडावर आल्यावरही पुन्हा शेतकऱ्यांना किमान एक ते सव्वा महिना कर्ज मिळण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे. सध्या हजारो शेतकरी एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात चकरा मारत आहेत.खरीपाचा हंगाम सुरु झाला असून शेतकरी बँकाकडून कर्ज प्राप्त करण्याकरिता खेटा मारित आहे. कर्ज प्राप्त करण्याकरिता मोठ्या अग्नीदिव्यातून सध्या शेतकऱ्यांना जावे लागत आहे. प्रथम तलाठ्याकडून सातबारा घेतल्यावर दुय्यम निबंधक कार्यालयाकडे जाऊन मुद्रांकावर दुय्यम निबंधकासमोर कर्ज उचल करण्याबाबत माहिती नमूद करावी लागते. नंतर तलाठ्याकडे सातबारावर शेतीवर बोजा चढवावा लागतो. नंतर सातबारा वर फेरफारची नोंद करावी लागते. त्यानंतर बँकेकडे रितसर अर्ज सादर करणे अनिवार्य आहे. बँकेकडून कर्ज प्राप्त झाल्यानंतर शेतीवरील बोजा कमी करण्याकरिता पुन्हा तलाठी कार्यालयात जाऊन शेतीवरील बोजा कमी करून त्याची सातबारात नोंद करणे आवश्यक आहे. आधारकार्ड लिंक असल्याने एक शेतकरी दुसरे कर्ज दुसऱ्या बँकेतून घेऊ शकत नाही. त्यामुळे ही पद्धती बंद करण्याची मागणी हजारो शेतकऱ्यांनी केली आहे.किमान एक ते सव्वा महिने फेरफार होत नसल्याने शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. एकरी ५० हजारांचे कर्ज मिळते. परंतु त्याकरिता शेतकऱ्यांना प्रथम खिशातून विविध सोपस्कार पार पाडण्याकरिता किमान ५ ते ६ हजार रुपये खर्च करावे लागतात. अशी तक्रार पंचायत समितीचे गटनेते हिरालाल नागपुरे यांनी केली आहे. राष्ट्रीयकृत बँकेतून शेतकऱ्यांना कर्ज देणे सुरु आहे. अनेक जाचक नियमांमुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. बँकेत, तहसील कार्यालयात तथा तलाठी कार्यालयात शेतकऱ्यांची मोठी गर्दी दिसत आहे. अनेक अर्ज भरताना शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडत असून दुसऱ्याची मदत येथे शेतकरी घेताना दिसत आहे.सध्या शेतकरी बांधावर दिसण्यापेक्षा बँकेच्या चकरा मारताना जास्त व्यस्त दिसत आहे. कागदपत्रांचा ससेमीरा कमी होण्यापेक्षा उलट वाढल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली.