शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
3
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
4
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
5
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
6
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
7
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
8
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
9
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
10
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
11
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
12
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
13
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
14
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
15
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
16
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
17
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
18
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
19
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
20
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
Daily Top 2Weekly Top 5

अपहृत मुलगा वडिलांच्या सुपूर्द

By admin | Updated: July 3, 2014 23:22 IST

तीन ते चार युवकांनी शाळेतून घरी परतणाऱ्या एका १५ वर्षीय विद्यार्थ्यांचे अपहरण करून त्याला बेशुद्ध केले. त्यानंतर हावडा-मुंबई या प्रवासी रेल्वेत सोडून दिले. भंडारा रोड रेल्वे स्थानकावर

हावडा-अहमदाबाद एक्सप्रेसमधील घटना : रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळलातुमसर : तीन ते चार युवकांनी शाळेतून घरी परतणाऱ्या एका १५ वर्षीय विद्यार्थ्यांचे अपहरण करून त्याला बेशुद्ध केले. त्यानंतर हावडा-मुंबई या प्रवासी रेल्वेत सोडून दिले. भंडारा रोड रेल्वे स्थानकावर त्या मुलाला शुद्ध आल्यानंतर त्याने रेल्वे पोलिसांना हकीकत सांगितली. रेल्वे पोलिसांनी त्याच्या वडिलांना बोलावून त्यांच्या स्वाधीन केले. मनोजकुमार ज्ञानकुमार शाहू (१५) रा.तुमडीबोड जि.राजनांदगाव (छत्तीसगड) असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे. मनोजकुमार शाहू हा दि.२ रोजी दुपारी शाळेतून घरी परत येताना तीन ते चार युवकांनी त्याचे अपहरण केले. त्याच्या शरीरावर ब्लेडने गंभीर जखमा केल्या. त्यानंतर हावडा-अहमदाबाद एक्सप्रेस रेल्वेत त्याला बेशुद्धावस्थेत डोंगरगड रेल्वेस्थानकावरून सोडून दिले. पाच तासानंतर तो शुद्धीवर आला. भंडारा रोड रेल्वे स्थानकावर रेल्वे थांबली. रेल्वेतून खाली उतरल्यानंतर त्याने रेल्वे स्थानकावर असलेल्या रेल्वे पोलीस एम.एन. झोडे यांना हकीकत सांगितली. त्यांनी मनोजच्या वडिलांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून माहिती दिली. ३ जूनला सकाळी ११ वाजताच्या सुमारास तुमसर रेल्वेस्थानकातील पोलीस निरीक्षक सी.के. टेंभुर्णीकर, एम.एन. झोडे, आलम खान यांच्या उपस्थितीत मनोजला वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. वडिलांना पाहून आनंदीत झालेल्या मनोजने अश्रुला वाट करुन दिली. ज्ञानकुमार शाहू यांनी मनोजचे दुसऱ्यांदा अपहरण करण्यात आल्याची माहिती पोलिसांना सांगितली. २७ मे रोजी मनोजचे पहिल्यांदा अपहरण झाले होते. याची तक्रार पोलिसात दिली होती. दि. २ जून रोजी डोंगरगड येथे मनोज हरविल्याची तक्रार दिली होती. तुमसर पोलिसांनी सर्वप्रथम डोंगरगड रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला होता. रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेने मनोज सुखरूप घरी आला होता. (तालुका प्रतिनिधी)