शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
2
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
3
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
4
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
5
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
6
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
7
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
8
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
9
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
10
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
11
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
12
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
13
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
14
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
15
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
16
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
17
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
18
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
19
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
20
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
Daily Top 2Weekly Top 5

दमदार पावसाने शेतकरी सुखावला

By admin | Updated: July 15, 2014 23:59 IST

मृग नक्षत्रात जोरदार पावसाच्या अपेक्षेने बळीराजाने पऱ्हे टाकले. मात्र पावसाने पाठ फिरविल्याने पऱ्हे करपले. काहींनी टँकरच्या पाण्याने तर काहींनी माठाने पाणी देऊन पऱ्हे वाचविले.

उत्पादनात घट होणार : काही ठिकाणी रोवणीला प्रारंभ
भंडारा : मृग नक्षत्रात जोरदार पावसाच्या अपेक्षेने बळीराजाने पऱ्हे टाकले. मात्र पावसाने पाठ फिरविल्याने पऱ्हे करपले. काहींनी टँकरच्या पाण्याने तर काहींनी माठाने पाणी देऊन पऱ्हे वाचविले. परंतु काल रात्रीपासून सुरु झालेल्या संततधार पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात सरासरी ३३.४ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यात आज मंगळवारला, भंडारा येथे २० मि.मी., मोहाडी १४.६ मि.मी., तुमसर ५७.२ मि.मी., पवनी ४९.५ मि.मी., साकाली ५०.० मि.मी., लाखांदूर ६.२ मि.मी., लाखनी ३६.२ मि.मी. असा सरासरी ३३.४ मि.मी. पाऊस बरसला. यावर्षी केवळ ३४ टक्के पाऊस झाला आहे. जलाशयात केवळ १९.५६ टक्के जलसाठा असून ४ मध्यम प्रकल्पात १४.८५ टक्के, ३१ लघु प्रकल्पात ४२.८८ टक्के, २८ मामा तलावात ४३.७१ टक्के जलसाठा आहे. आजचा सर्वाधिक पाऊस तुमसर तालुक्यात तर कमी पाऊस लाखांदूर तालुक्यात झाला.
ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सुविधा आहे, त्या शेतकऱ्यांनी रोवणीला प्रारंभ केला आहे. परंतु पाऊस समाधानकारक नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. दरवर्षी १५ जुलैपर्यंत ४० टक्के रोवणी होण्याची गरज होती. परंतु मागीलवर्षी अतिवृष्टीमुळे रोवणी खोळंबली होती. पऱ्हे सडून गेले होते. त्यामुळे दुबार पेरणी करावी लागली. यावर्षी पावसाअभावी पऱ्हे सुकल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे.
तुमसरात धो-धो
काल रात्रीपासून तुमसर शहरात धो-धो पाऊस बरसत आहे. आतापर्यंत बावनथडी प्रकल्पाच्या पाण्यावर पऱ्हे वाचविणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
पावसाचा घटता आलेख
मागीलवर्षीची अतिवृष्टी वगळल्यास त्यापूर्वीच्या चार वर्षाचा पावसाच्या सरासरीचा आलेख बघितल्यास दुष्काळ सदृष्यस्थिती लक्षात येईल. पावसाच्या अंदाजावर शेतकरी अवलंबून असतो. मात्र यावर्षीचा अंदाज चुकला. चौरास भागात विहिरीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सिंचन होते.
जलाशयाची स्थिती भीषण
भंडारा जिल्ह्यात चार मध्यम, ३१ लघु आणि २८ माजी मालगुजारी असे एकूण ६३ तलाव असले तरी एकही प्रकल्प शंभर टक्के भरलेला नाही. गोसीखुर्द आणि बावनथडी प्रकल्पात पर्याप्त जलसाठा असला तरी हा जलसाठा पेरणीसाठी उपयोगी ठरला नाही. प्रकल्पाचे पाणी रोवणीपूर्वी चिखलासाठी आवश्यक असते. काल रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. (लोकमत चमू)