जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:25 IST2021-06-05T04:25:52+5:302021-06-05T04:25:52+5:30

लाखांदूर तालुक्यात गत दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता या परिसरात जोरदार पाऊस कोसळला. गुरुवारी वादळात ...

Heavy presence of pre-monsoon rains in the district | जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी

जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी

लाखांदूर तालुक्यात गत दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता या परिसरात जोरदार पाऊस कोसळला. गुरुवारी वादळात वीज कोसळून एक गाय ठार झाल्याची घटना तालुक्यात घडली होती. जिल्ह्यात सध्या धान मळणीचे काम शेवट्या टप्प्यात आहे. अनेकांचे धान उघड्यावर असून, या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे.

बॉक्स

जिल्ह्यात आतापर्यंत ६.८ मि.मी. पाऊस जिल्ह्यात १ ते ४ जूनदरम्यान ६.८ मि.मी. पावसाची नोंद घेण्यात आली आहे. त्यात लाखांदूर तालुक्यात आतापर्यंत ३४.३ मि.मी., पवनी तालुक्यात १०.२ मि.मी. आणि लाखनी तालुक्यात ३.४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे, तर गत २४ तासांत लाखांदूर तालुक्यात २९.३ मि.मी. पाऊस झाला आहे. भंडारा, मोहाडी, तुमसर तालुक्यात गत २४ तासांत कुठेही पावसाची नोंद झाली नाही.

बॉक्स

जिल्ह्यात १५ ते १७ जूनदरम्यान मान्सूनचे आगमन

केरळ किनारपट्टीवर मान्सूनचे आगमन झाले असून, पुढील प्रवास निर्विघ्नपणे झाल्यास भंडारा जिल्ह्यात १५ ते १७ जूनदरम्यान मान्सूनच्या पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे. सध्याच्या पूर्व मोसमी पावसाच्या सरीवर पेरणी न करता समाधानकारक पाऊस झाल्यास (७५ ते १०० मि.मी.) जमिनीत ओलावा आल्याची खात्री करूनच पेरणीचा निर्णय घ्यावा, असे आवाहन जिल्हा कृषी हवामान केंद्राच्या तज्ज्ञांनी सांगितले आहे. हवामान आधारित कृषी सल्ला व अचूक अंदाज प्राप्त होण्यासाठी जिल्हा हवामान केंद्राचे नोडल अधिकारी डॉ. एन. एस. वझिरे, साकोली येथील कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Heavy presence of pre-monsoon rains in the district