शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

स्टेअरिंगवरील हात स्थिरावले शेतीकामात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 05:00 IST

धनवंत चामलाटे रा.पलाडी असे या चालकाचे नाव आहे. ते एसटी महामंडळात नियमित बसचालक म्हणून कार्यरत होते. सुमारे २५ वर्ष निष्णात हातांनी शेकडो प्रवाशांना त्यांनी आपल्या गावापर्यंत पोहचविले होते. मात्र कोरोनाचे संकट आले. २२ मार्चपासून एसटीची चाके थांबली. सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. जगण्यासाठी एकच पर्याय उरला. तो म्हणजे शेती. आपल्या वडीलोपार्जीत शेतीत भाजीपाला पीक घेण्याचे नियोजन केले.

ठळक मुद्देबसचालकाची कहाणी, कोरोनाने बदलले जीवनाचे अर्थकारण

संतोष जाधवर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना संसर्गाचा परिणाम जाणवायला लागला आहे. अनेकांचा रोजी रोटीचा व्यवसायही बंद झाला. नोकरीवर असणाऱ्यांना घरी पाठविण्यात आले. जीवन जगण्यासाठी व्यवसाय बदलून संघर्ष सुरु झाला. असाच संघर्ष एसटी महामंडळातील चालकाच्या वाट्याला आला. महामंडळाने सक्तीच्या रजेवर पाठविले. मात्र त्याने स्वस्थ न बसता शेतीत वेळ घालविणे सुरु केले. भाजीपाला उत्पादनातून आर्थिक स्थिती सावरण्याचा प्रयत्न चालविला. निष्णातपणे एसटीबस ते स्टेअरिंग सांभाळणारे हात आता शेतीव्यवसायात स्थिरावले आहेत.धनवंत चामलाटे रा.पलाडी असे या चालकाचे नाव आहे. ते एसटी महामंडळात नियमित बसचालक म्हणून कार्यरत होते. सुमारे २५ वर्ष निष्णात हातांनी शेकडो प्रवाशांना त्यांनी आपल्या गावापर्यंत पोहचविले होते. मात्र कोरोनाचे संकट आले. २२ मार्चपासून एसटीची चाके थांबली. सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. जगण्यासाठी एकच पर्याय उरला. तो म्हणजे शेती. आपल्या वडीलोपार्जीत शेतीत भाजीपाला पीक घेण्याचे नियोजन केले. पाऊण एकरात भाजीपाला पिकाची लागवड केली. राष्ट्रीय महामार्गावर त्याची विक्री सुरु झाली. या काळात ७० ते ८० हजार रुपये निव्वळ नफा मिळाला. ते एवढ्यावरच थांबले नाही. आपल्या शेतातील आंब्याची योग्य देखरेख केली. उन्हाळ्यात आंब्याचे भरघोस उत्पन्न आले. त्यातूनही ८० हजाराचा नफा झाला. उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड यांनी चालकाच्या उद्यमशीलतेचे कौतूक केले.राष्ट्रीय महामार्गावरून प्रवासी करत असताना भाजीपाला खरेदीच्या निमित्ताने चामलाटे यांचा परिचय झाला. कोणत्या वेळी कोणती पिके घ्यायची व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यावर मार्गदर्शन करण्यात आले. वारंवार भेटी होत गेल्या. आधुनिक शेतीची कास धरली तर शेतकऱ्यांची प्रगती आजही निश्चितच होऊ शकते हे धनीवंत चामलाटे यांच्या उदाहरणावरून दिसून येते. शेतकºयांनी आदर्श घेण्याची गरज आहे.-होमराज धांडे, मंडळ कृषी अधिकारी पहेलानिवृत्तीनंतर पूर्ण वेळ शेती करणारभंडारा आगारात असलेले धनवंत चामलाटे यांच्या निवृत्तीला आता दीड वर्ष बाकी आहे. निवृत्तीनंतर पूर्ण वेळ शेती करण्याचा मनोदय त्यांनी केला आहे. कोरोनाने जगावर संकट आले असले तरी एका चालकाला मात्र कोरोनाने शेती व्यवसायात आणून अर्थार्जनाचा नवा मार्ग दाखविला. लॉकडाऊनने आपल्याला चांगलेच शिकविले. शेतीसाठी त्यांना तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, मंडळ अधिकारी होमराज धांडे यांनी मार्गदर्शन केले. आता त्यांनी पाच एकर क्षेत्रात धानाची लागवड केली आहे. भाजीपाला व इतर शेतीपिकातून उत्पन्न चांगले मिळू शकते हे आपल्या अनुभवातून कळले. एसटीची नोकरी करताना शेती करणे शक्य नव्हते. लॉकडाऊन झाले नसते तर निवृत्तीनंतर घरी बसून राहलो नसतो. आता शेतीत पूर्णवेळ राबणार असल्याचे चामलाटे यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती